अपडेटइतरजालना

मनोज जरांगे पाटील यांना मिळणार सरकारी सुरक्षा…

Share this post

जालना येथील आंतरवाली सराटी येथून सुरु झालेला मराठा आरक्षणाचा प्रवास आता अखेरच्या टप्प्यात आला आहे. आरक्षणासाठी उपोषण करमारे आणि ठिकाणठिकाणचे दौरे करुन मराठा बांधवांना एकत्रित करणारे मनोज जरांगे पाटील यांचा लढा येत्या काही दिवसांतच संपण्याची शक्यता आहे. त्याच दरम्यान, जरांगेंबाबत राज्य सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. मनोज जरांगे यांना राज्य सरकारकडून सुरक्षा पुरवण्यात येणार आहे. त्यांच्या सुरक्षेसाठी पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत.

राज्य गुप्त वार्ता विभागाच्या आदेशाने मनोज जरांगे यांना सरकारी सुरक्षा प्रदान करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जरांगे यांच्या सुरक्षेसाठी २४ तास दोन सशस्त्र पोलिसांचा बंदोबस्त असणार आहे. दरम्यान, त्याआधी सकल मराठा समाजाकडून मुख्यमंत्र्यांकडे मनोज जरांगे यांना सुरक्षा पुरवण्याची मागणी करण्यात आली होती. त्यानुसार आजपासून दोन कॉन्स्टेबल सुरक्षेसाठी नेमण्यात आले आहेत.

आंतरवाली सराटी गावात २९ ऑगस्ट रोजी सुरु झालेला जरांगेचा लढा पोलिसांनी आंदोलकांवर केलेल्या लाठीचार्जमुळे राज्यभर पोहोचला. जोपर्यंत मराठ्यांना आरक्षण मिळणार नाही, तोपर्यंत मागे हटणार नाही, अशी भूमिका मनोज जरांगे यांनी घेतली होती. जरांगे यांच्या आंदोलनाने राज्यातील मराठा आरक्षण आंदोलनाचा वणवा पुन्हा एकदा पेटला. मराठा समाजाने आरक्षणासाठी मुंबईवर मोर्चा काढला. या मुंबई मोर्चाला मोठा प्रतिसाद मिळाला. त्यानंतर नवी मुंबईत आल्यानंतर राज्य सरकारने जरांगे यांना सरकारने आश्वासन दिल्यानंतर मोर्चा स्थगित करण्यात आला. यानंतर आता जरांगेंना सुरक्षा पुरवण्यात आली आहे.


Share this post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *