भारत ऑस्ट्रेलिया T 20 रोमांचक सामन्यात कांगारूंचा पराभव…
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पाचवा T 20 सामना बंगळुरू येथे खेळला गेला. रोमांचक अशा सामन्यात टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाचा 6 धावांनी पराभव केला असून मालिका 4-1 ने जिंकली आहे.
टीम इंडियाने कांगारुंसमोर 161 धावांचं आव्हान ठेवलं होतं. त्याला प्रत्युत्तर देताना ऑस्ट्रेलियाला 154 धावाच करता आल्या.उपकर्णधार श्रेयस अय्यर याने अर्धशतकी खेळी केली. तर गोलंदाजीमध्ये मुकेश कुमार आणि अर्शदीप सिंग यांनी उत्तम गोलंदाजी केली.
टीम इंडियाने दिलेल्या 161 धावांचा पाठलाग करत ऑस्ट्रेलियाने दमदार सुरूवात केली. ट्रेविस हेड अन् बेन मॅकडरमॉट यांनी आक्रमक सुरूवात करून दिली. मात्र, रवी बिश्नोईने हेड व अर्शदीपने मॅकडरमॉटला बाद केले. त्यानंतर टीम डेव्हिड आणि मॅथ्यू शॉट बाद झाले. मुकेश कुमारने एकाच ओव्हरमध्ये दोन धक्के दिले अन् सामना रोमांचक स्थिती आणला. ऑस्ट्रेलियाला अखेरच्या ओव्हरमध्ये 10 धावांची गरज होती. अर्शदीप सिंगने वेडला बाद करून सामना फिरवला अन् सामना भारताने 6 धावांनी जिंकला.
𝗪𝗜𝗡𝗡𝗘𝗥𝗦 👏
— BCCI (@BCCI) December 3, 2023
Congratulation to the Suryakumar Yadav-led unit on winning the #INDvAUS T20I series 4-1 🙌#TeamIndia | @IDFCFIRSTBank pic.twitter.com/IoLhgW1U0J

