अपडेटक्रीडाराष्ट्रीय

भारत इंग्लंडला धुळ चारत टी-२० वर्ल्ड कप २०२४ च्या अंतिम फेरीत

Share this post

भारताने इंग्लंडला धुळ चारत टी-२० वर्ल्ड कप २०२४ च्या अंतिम फेरीत दिमाखात प्रवेश केला आहे.

रोहित शर्माने या सामन्यातही धडाकेबाज फटकेबाजी करत अर्धशतक झळकावले. रोहितच्या या अर्धशतकाच्या जोरावर भारताने प्रथम फलंदाजी करताना १७१ धावा केल्या होत्या. या आव्हानाचा पाठलाग करताना भारताने जोस बटलरला पॉवर प्लेमध्येच बाद केले आणि तिथेच त्यांनी इंग्लंडला बॅकफूटवर ढकलले होते. त्यानंतर कुलदीपने तीन विकेट्स घेत इंग्लंडला मोठा झटका दिला व भारताने यावेळी इंग्लंडवर ६८ धावांनी विजय साकारला आणि अंतिम फेरीत प्रवेश केला.

विराट कोहली यावेळी फक्त ९ धावांवर बाद झाला. त्यानंतर ऋषभ पंतला फक्त चार धावांवर समाधान मानावे लागले. दोन विकेट्स झटपट पडल्या असल्या तरी त्यानंतर रोहितने त्यानंतर सूर्यकुमार यादवच्या साथीने तिसऱ्या विकेटसाठी ७३ धावांची भागीदारी रचली. रोहित बाद झाल्यावर सूर्या दमदार फलंदाजी करत ४ चौकार आणि दोन षटकारांच्या जोरावर ४७ धावा केल्या. तयानंतर हार्दिकने यावेळी १३ चेंडूंत २३ धावा केल्या. भारताला या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना १७१ धावा करता आल्या.

भारताच्या १७२ धावांचा पाठलाग करताना जोस बटलरने इंग्लंडला चांगली सुरुवात करून दिली होती. पण अक्षर पटेलने आपल्या पहिल्याच चेंडूवर बटलरला बाद केले आणि भारतासाठी विजयाचे दार उघडले. बटलरने यावेळी १५ चेंडूंत २३ धावा केल्या. त्यानंतर इंग्लंडचा डाव गडगडायला लागला. कारण अक्षर पटेल एका विकेटवर थांबला नाही तर त्याने मोईन अली आणि जॉनी बेअरस्टो यांनाही बाद केले. अक्षरला यावेळी चांगली साथ दिली ती कुलदीप यादवने. कारण कुलदीपने यावेळी सॅम करन आणि हॅरी ब्रुक्स यांना बाद केले. त्यामुळे इंग्लंडची ६ बाद ६८ अशी अवस्था केली होती.भारताने यावेळी इंग्लंडवर ६८ धावांनी विजय साकारला आणि अंतिम फेरीत प्रवेश केला.


Share this post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *