भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात इंडियन पॅनोरमाला सुरू…
गोव्यात सुरू असलेल्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात अर्थात ईफ्फी मध्ये आज इंडियन पॅनोरमाला सुरूवात होणार आहे. केंद्रीय माहिती आणि प्रसारणमंत्री अनुराग सिंह ठाकूर इंडियन पॅनोरमाच्या उद्घाटन सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत. या विभागात 25 चित्रपट आणि 20 कथाबाह्य चित्रपट दाखवण्यात येतील.
आनंद एकरसाही दिग्दर्शित मल्याळम भाषेतला ‘अट्टम’ हा इंडियन पॅनोरमा विभागातला पहिला चित्रपट असेल. तर कथाबाह्य विभागात मीना लोंगजम दिग्दर्शित ‘अँड्रो ड्रीम्स’ हा माहितीपट सुरुवातीला दाखवण्यात येईल.इंडियन पॅनोरमा विभागात दाखवल्या जाणाऱ्या इतर चित्रपटांमध्ये विवेक अग्निहोत्री दिग्दर्शित हिंदी चित्रपट ‘द व्हॅक्सिन वॉर’, ऋषभ शेट्टी दिग्दर्शित कन्नड चित्रपट ‘कांतारा’ आणि कौशिक गांगुली दिग्दर्शित बंगाली चित्रपट ‘अर्धांगिनी’ यांचा समावेश आहे. यावेळी अनुराग सिंह ठाकूर यांच्या हस्ते ’75 क्रिएटिव्ह माइंड्स ऑफ टुमारो’ या तरुण कलाकारांसाठीच्या विशेष उपक्रमाचंही उद्घाटन करण्यात येणार आहे.


