भारतातील लोकांचा शिक्षकांवर सर्वात अधिक विश्वास…

नुकताच इप्सॉस ग्लोबल ट्रस्ट वर्दीनेस इंडेक्स 2023 चा अहवाल सादर करण्यात आला आहे.
शिक्षक म्हटले की काम कमी व पगार घेतात असे सहज काही लोक बोलतात. मात्र नुकताच सादर झालेला अहवाल बघितल्यानंतर हा समज चुकीचा असू शकतो. कारण शासनाकडून महत्वाची काम करतांना शिक्षकांची मदत घेतली जाते. निवडणूक प्रक्रिया, जनगणना, विविध सर्वेक्षण,कोरोना काळ अश्या बऱ्याच गोष्टीत शिक्षकांनी आपले कर्तव्य बजावले आहे.
इप्सॉस ग्लोबल ट्रस्ट वर्दीनेस इंडेक्स 2023 चा अहवालानुसार शिक्षक भारतात सर्वाधिक विश्वासू म्हणून सिद्ध झालेले आहे. भारतातील लोकांनी शिक्षकांना सर्वाधिक विश्वासू म्हणून प्रथम पसंती दिलेला आहे. दुसऱ्या क्रमांकावर सशस्त्र दलातील लोकांना पसंती भारतातील लोकांनी दिली तर तिसऱ्या क्रमांकावर डॉक्टर हे सर्वाधिक विश्वासू असल्याचे अहवालातून स्पष्ट झाले आहे.
हा अहवाल अंदाजे 22 हजार लोकांच्या आधारे सादर करण्यात आलेला आहे. या लोकांपैकी 53% विश्वास लोकांनी शिक्षकांवर दर्शवला त्यानंतर 52% विश्वास लोकांनी सशस्त्र दलावर दर्शवला तर 51% विश्वास लोकांनी डॉक्टरांवर दर्शवलेला आहे.
या अहवालात अनुक्रमे बघितले तर शास्त्रज्ञांवर 49% विश्वास न्यायाधीशांवर 46% महिला 46% बँकर 45% पुरोहित यांच्यावर 34% पोलीस दलावर 33% सरकारी कर्मचारी आणि नागरिक सेवक यांच्यावर 32% वकील 32% व पत्रकार 30 टक्के असे अंक या अहवालानुसार समोर आले आहे.
