अपडेटमहाराष्ट्रशैक्षणिक

बोर्डाच्या परीक्षेत इंग्रजीपेक्षा मराठीत नापास होण्याचं प्रमाण जास्त

Share this post

नुकताच 10 वी परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने घेतलेल्या इयत्ता 10 वीचा यावर्षीचा संपूर्ण राज्याचा निकाल 95. 81 टक्के इतका लागला आहे. या निकालातून आता धक्कादायक माहिती समोर आली आहे. मराठी भाषिक राज्यात इंग्रजी भाषेपेक्षा मराठीत नापास होणार्‍या विद्यार्थ्यांची संख्या 6 पटीने जास्त आहे.

यंदा राज्याचा निकाल 95. 81 टक्के इतका लागला. यावर्षी 14 लाख 84 हजार 441 विद्यार्थी पास झाले आहेत. एकंदरीत निकाल पाहता नापास होणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रमाण तुलनेने कमी आहे. पण दुर्दैवाने या परीक्षेत मराठी विषयात राज्यभरातून 38 हजार 437 विद्यार्थी नापास झालेत.

संपूर्ण राज्यात मुंबईत मराठी विषयात नापास होणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या सर्वात जास्त म्हणजे 4 हजार 670 इतकी आहे. मुंबईत 1 लाख 6 हजार 256 विद्यार्थ्यांनी मराठीच्या परीक्षेसाठी नोंदणी केली होती. प्रत्यक्षात 1 लाख 5 हजार 322 विद्यार्थी परीक्षा केंद्रावर हजर राहीले त्यापैकी 1 लाख 652 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. इंग्रजी भाषेपेक्षा मराठीत नापास होणार्‍या विद्यार्थ्यांची संख्या सहापटीने जास्त आहे.

इंग्रजी भाषेपेक्षा मराठीत नापास होणार्‍या विद्यार्थ्यांची संख्या सहापटीने जास्त आहे. महाराष्ट्रामध्ये मराठी भाषेच्या परीक्षेसाठी 11 लाख 3 हजार 307 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. मराठी विषयाची परीक्षा देणाऱ्या 10 लाख 94 हजार 152 विद्यार्थ्यांपैकी 10 लाख 55 हजार 715 विद्यार्थी पास झाले आहेत. मराठी भाषा विषयाचा निकाल 96.49 टक्के लागला.


Share this post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *