बृहन्मुंबई महानगरपालिकेमध्ये लिपिक पदाच्या १ हजार ८४६ जागांसाठी भरती
बृहन्मुंबई महानगरपालिकेतील विविध खात्यांच्या आस्थापनेवरील गट ‘क’ मधील रु. २५,५००-८११०० (पे मॅट्रिक्स-एम १५) अधिक अनुज्ञेय भत्ते या सुधारित वेतनश्रेणीतील ‘कार्यकारी सहायक’ (पूर्वीचे पदनाम: लिपिक) या संवर्गातील १ हजार ८४६ रिक्त पदे सरळसेवेने भरण्यात येणार आहेत. यामध्ये अनुसूचित जाती (१४२), अनुसूचित जमाती (१५०), विमुक्त जाती-अ (४९), भटक्या जमाती-ब (५४), भटक्या जमाती-क (३९), भटक्या जमाती-ड (३८), विशेष मागास प्रवर्ग (४६), इतर मागासवर्ग (४५२), आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक (१८५), सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्ग (१८५), खुला प्रवर्ग (५०६ ) याप्रमाणे रिक्त पदांसाठी ही भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे.
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या संकेतस्थळावरील https://www.mcgm.gov.in/irj/portal/anonymous/qlrn या लिंकवर या पदासाठीची संपूर्ण जाहिरात, अटी व शर्तींसह प्रसिद्ध करण्यात आली आहे. या जाहिरातीमध्ये ऑनलाईन अर्जाची लिंक देण्यात आली असून त्यावर इच्छुक उमेदवारांना अर्ज भरता येईल. त्यानुसार, दिनांक २० ऑगस्ट २०२४ पासून दिनांक ९ सप्टेंबर २०२४ पर्यंत उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज दाखल करता येईल.
अधिक माहितीसाठी अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या.