अपडेटक्राईमधुळे

बारा हजारांची लाच घेताना, आश्रमशाळेच्या मुख्याध्यापकासह अधिक्षकास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले…

Share this post

बचत गटास बिल अदा केल्याच्या मोबदल्यात बक्षिस म्हणून २० हजारांची लाचेची मागणी करुन तडजोडीअंती १२ हजारांची लाच स्विकारतांना आश्रम शाळेच्या अधीक्षकांसह मुख्याध्यापकाला धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ ताब्यात घेत दोघांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तक्रारदार यांची पत्नी ही शिंदखेडा पंचायत समिती येथे नोंदणी झालेल्या “सखी स्वयः सहायता समुह” या महिला आदिवासी बचत गटाच्या सचिव आहेत. त्यांच्या बचत गटाने शासकिय प्राथमिक आश्रमशाळा, म्हळसर, कॅम्प सुलवाडे, ता. शिंदखेडा जि. धुळे येथे शालेय पोषण आहाराच्या निविदेमधुन गरजेप्रमाणे भाजीपाला व खाद्यपदार्थ पुरवठा करण्याचे काम घेतले असुन सदरच्या कामात तक्रारदार हे त्यांच्या पत्नीस मदत करीत असतात.

सदर बचत गटाने शासकिय प्राथमिक आश्रमशाळा, म्हळसर, कॅम्प सुलवाडे, ता. शिंदखेडा जि. धुळे येथे भाजीपाला व खाद्यपदार्थ पुरवठयाचे मागील ०९ महिन्याचे बिल दोन लाख रुपय बचत गटाच्या बँक खात्यात जमा झाले होते. सदर बिल अदा करण्याकरीता मुख्याध्यापक प्रदिपकुमार राठोड यांनी २६ हजार रुपये याआधी तक्रारदार यांच्या कडुन घेतले होते.

त्यानंतर दि.२५.०१.२०२४ रोजी मुख्याध्यापक राठोड यांनी तक्रारदार यांचेकडे बचत गटाचे ०९ महिन्याचे भाजीपाला व खाद्यपदार्थ पुरवठयाचे दोन लाख रुपये बिल बचत गटास अदा करण्याकारीता मदत केल्याच्या मोबदल्यात बक्षीस म्हणुन २० हजार रुपये लाचेची मागणी करुन सदर रक्कम दिली तरच पुढील ०२ महिन्याचे बिल अदा करण्यास मदत करेल असे सांगीतल्याने तक्रारदार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, धुळे कार्यालयात दुरध्वनीवर माहिती दिली होती.

सदर माहितीवरुन धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागांच्या पथकाने शिंदखेडा येथे जावून तक्रारदार यांची तक्रार घेतली होती. सदर तक्रारीची दि. २६.०१.२०२४ रोजी पडताळणी केली असता पडताळणी दरम्यान मुख्याध्यापक राठोड यांनी तक्रारदार यांचेकडे २० हजार रुपय लाचेची मागणी करुन तडजोडीअंती १२ हजार रुपये स्विकारण्याचे मान्य करुन अधीक्षक हनुक भादले यांनी सदर लाचेची रक्कम देण्याकरीता तक्रारदार यांना प्रोत्साहीत केले होते.

दि.२९.०१.२०२४ रोजी त्यांच्यावर सापळा लावला असता अधीक्षक हनुक भादले यांनी तक्रारदार यांच्याकडुन १२ हजार रुपयची लाच स्विकारल्याने दोघांना पकडण्यात आले असुन त्यांचे विरुध्द शिंदखेडा पो.स्टे. जि. धुळे येथे भ्रष्टाचार प्रतिबंध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदरची कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक धुळे विभागाचे पोलीस उप अधीक्षक अभिषेक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रुपाली खांडवी, हेमंत बेडाळे, मंजितसिंग चव्हाण तसेच पथकातील राजन कदम, मुकेश अहिरे, संतोष पावरा, रामदास बारेला, प्रशांत बागुल, मकरंद पाटील, प्रविण मोरे, प्रविण पाटील, सुधीर मोरे व जगदीश बडगुजर या पथकाने केली आहे.

सदर कारवाईस नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नाशिक परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा वालावलकर, अपर पोलीस अधीक्षक माधव रेड्डी व वाचक पोलीस अधीक्षक नरेंद्र पवार यांचे मार्गदर्शन लाभले आहे. सदर गुन्हयाचा पुढील तपास सुरु आहे.


Share this post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *