बारावीच्या परीक्षेला आजपासून सुरुवात, कॉफी बहाद्दरांना पकडण्यासाठी राज्यात २७१ भरारी पथके…
आजपासून राज्य शिक्षण मंडळाची बारावीची लेखी परीक्षा (12th Board Exam) सुरू होत आहे. राज्यातील 15 लाख 13 हजार 909 विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केलेली आहे. परीक्षेच्या निर्धारित वेळेनंतर विद्यार्थ्यांना १० मिनिट वेळ वाढवून देण्यात येणार आहे. सर्वत्र परीक्षेची लगबग दिसून येत आहे. परीक्षेसंदर्भात काही महत्वाचे बदल देखील करण्यात आले आहेत.
अनेकदा बरेच विद्यार्थी परीक्षेमुळे घाबरून जातात. परीक्षेच्या भीतीने मानसिक दडपण येऊ नये म्हणून विद्यार्थ्यांसाठी समुपदेशकांची नियुक्ती देखील यावेळी करण्यात आली (Maharashtra HSC) आहे. जेणेकरून विद्यार्थी सकारात्मकतेने परिक्षेला सामोरे जातील, काही गैरप्रकार होणार नाही. विद्यार्थ्यांच्या हिताच्या अनुषंगाने हा निर्णय घेण्यात आला आहे.
परीक्षेदरम्यान अनेकदा गैरप्रकार होत असतात. यावेळी कॉफी बहाद्दरांवर भरारी पथकाची करडी नजर असणार आहे. परीक्षेच्या काळात गैरप्रकार टाळण्यासाठी राज्यात २७१ भरारी पथकांची (Bharari Pathak) नेमणूक करण्यात आली आहे. कोणी जर परीक्षेदरम्यान काही अनुचित प्रकार करत असेल तर त्याच्यावर कठोर कारवाई केली जाणार आहे.
परीक्षा दोन सत्रांत पार पडणार आहे. सकाळचे सत्र ११ वाजता सुरू होणार (HSC Board Exam) आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांनी परीक्षा केंद्रावर साडेदहा वाजता उपस्थित राहणे अनिवार्य आहे. तर दुपारचे स्तर ३ वाजता सुरू होणार आहे. त्यामुळे परीक्षेसाठी विद्यार्थ्यांनी अडीच वाजता परीक्षा केंद्रावर उपस्थित राहणे अनिवार्य आहे.
