अपडेटक्रीडा

बांगलादेशविरुद्धच्या मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा

Share this post

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने बांगलादेशविरुद्धच्या मालिकेतील पहिल्या सामन्यासाठी संघाची घोषणा केली आहे. भारतीय संघ या महिन्यात बांगलादेशविरुद्ध घरच्या मैदानावर दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळत आहे. पहिला सामना चेन्नईमध्ये १९ सप्टेंबरपासून तर दुसरा सामना २७ सप्टेंबरपासून कानपूरमध्ये होणार आहे.

संघात विकेटकीपर फलंदाज ऋषभ पंतचे पुनरागमन झाले आहे. ही भारतीय संघाची मार्च २०२४ नंतर पहिली रेड बॉल कसोटी मालिका आहे. गेल्या मालिकेत इंग्लंडला ४-१ असे हरवले होते. दुसरीकडे ही सीरज भारताचे प्रमुख प्रशिक्षक गौतम गंभीरची पहिली रेड बॉल मालिका असेल.

या मालिकेसह वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहचे पुनरागमन होत आहे. त्यांने टी-२० वर्ल्डकप फायनल नंतर ब्रेक घेतला होता. हा फायनल सामना २९ जूनला झाला होता. सोबतच दुसरा विकेटकीपर म्हणून ध्रुव जुरेलची निवड करण्यात आली आहे.

पहिल्या कसोटीसाठी श्रेयस अय्यर, देवदत्त पड्डिकल, इशान किशन आणि ऋतुराज गायकवाड यांना स्थान मिळालेले नाही. केएल राहुलला फलंदाज म्हणून सामील करण्यात आलेले आहे. कर्णधारपद रोहित शर्माकडे देण्यात आलेले आहे. तर स्पिनर म्हणून आर. अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव यांची निवड करण्यात आली आहे.

रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जयसवाल, शुभमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, सरफराज खान, ऋषभ पंत (विकेटकीपर), ध्रुव जुरेल (विकेटकीपर), रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, आकाश दीप, जसप्रीत बुमराह आणि यश दयाल.


Share this post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *