अपडेटराष्ट्रीय

प्रेक्षक गॅलरीतून लोकसभेत घुसखोरी,महाराष्ट्राच्या विधिमंडळाचे प्रेक्षक गॅलरीचे पास बंद…

Share this post

प्रेक्षक गॅलरीतून काही जणांनी लोकसभेत घुसखोरी केली. ही धक्कादायक घटना बुधवारी दुपारी कामकाज सुरू असताना घडली. सुरक्षा रक्षकांनी घुसखोरांना पकडले आहे. घुसखोरांची चौकशी सुरू आहे. लोकसभेचे कामकाज दुपारी दोन वाजेपर्यंत तहकूब करण्यात आले होते.

घुसखोरी करणाऱ्यांना पोलिसांनी पकडले आहे. घुसखोरांची चौकशी सुरू आहे. यात अमोल शिंदे, लातूर जिल्हा, चाकूर तालुका, थोरली झरी गाव – वय २५, नीलम सिंग, सागर शर्मा, मनोरंजन, विकी शर्मा आणि ललित झा. यांचा समावेश आहे.

घुसखोरांनी म्हैसूरच्या खासदाराच्या नावाने लोकसभेत प्रवेश करण्यासाठी पास (व्हिजिटर पास) तयार करून घेतल्याचे उघड झाले आहे.

सागर शर्मा आणि कर्नाटकच्या मनोरंजन याने सभागृहात उड्या मारल्या. याचबरोबर स्मोक कॅण्डल देखील जाळले. त्यामुळे सभागृहात धुराचे लोट पसरले. हे सगळं घडत असताना संसदेबाहेर, नीलम सिंग आणि अमोल शिंदे निदर्शन करत होते. दरम्यान, याप्रकरणी पोलिसांनी ५ जणांना अटक केली असून एकजण फरार आहे.

लोकसभेत झालेल्या घुसखोरीप्रकरणी दिल्ली पोलीस चौकशी करणार आहेत. घुसखोरी करणाऱ्यांची कसून चौकशी केली जाणार आहे. संसदेची सुरक्षा भेदून सभागृहात गोंधळ घालणाऱ्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने UAPA कलमांतर्गत हा गुन्हा दाखल केला आहे.

संसदेत घडलेल्या घटनेनंतर संसदेचे आणि महाराष्ट्राच्या विधिमंडळाचे प्रेक्षक गॅलरीचे पास देण्यावर पुढील आदेशापर्यंत तातडीने बंदी घालण्यात आली आहे.


Share this post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *