अपडेटमनोरंजन

प्रसिद्ध टीव्ही अभिनेते ‘ऋतुराज सिंह’ यांचे निधन…

Share this post

टीव्ही इंडस्ट्रीमधून दुःखद बातमी समोर आली आहे. प्रसिद्ध टीव्ही अभिनेते ऋतुराज सिंह यांचे निधन झाले आहे. वयाच्या ६० व्य वर्षी त्यांनी जगाचा निरोप घेतला. सोमवारी रात्री हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले. अनेक प्रसिद्ध टीव्ही मालिकांच्या आणि चित्रपटांच्या माध्यमातून ऋतुराज यांनी प्रेक्षकांचे मनोरंजन केले आणि त्यांचे मन जिंकले. ऋतुराज यांच्या निधनाने टीव्ही इंडस्ट्रीसोबत बॉलिवूडला देखील मोठा धक्का बसला आहे.

ऋतुराज सिंहने ‘ज्योती’, ‘हिटलर दीदी’, ‘शपथ’, ‘वॉरियर हाय’, ‘आहट और अदालत’, ‘दीया और बाती हम’ यासारख्या प्रसिद्ध टीव्ही मालिकांमध्ये काम केले होते. शेवटी तो रुपाली गांगुलीसोबत अनुपमा या मालिकेमध्ये दिसला. ऋतुराजने या मालिकेच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या मनामध्ये वेगळं स्थान निर्माण केलं होतं. ऋतुराजच्या निधनामुळे सर्वांना मोठा धक्का बसला असून सोशल मीडियावर पोस्ट करत चाहते आणि सेलिब्रिटी दु:ख व्यक्त करत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसर, ऋतुराज सिंहला सोमवारी म्हणजे १९ फेब्रुवारीला रात्री हृदयविकाराचा तीव्र झटका आला. त्याला तात्काळ रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले. पण उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. ऋतुराज गेल्या काही दिवसांपासून स्वादुपिंडाशी संबंधित त्रासाने ग्रस्त होता. ऋतुराज यांच्या अचानक मृत्यूमुळे त्यांच्या कुटुंबियांना व चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.

ऋतुराजचा मित्र आणि अभिनेता अमित बहलने त्याच्या निधनाची बातमी माध्यमांना सांगत दुःख व्यक्त केले. अमित बहलने सांगितले की, ‘हृदयविकाराच्या तीव्र झटक्यामुळे ऋतुराज सिंह यांचे निधन झाले. स्वादुपिंडांशी संबंधित त्रासामुळे त्याच्यावर उपचार सुरू होते. यासाठी त्याला रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले होते. पण रुग्णालयातून घरी येत असताना त्याला हृदयविकाराचा झटका आला आणि त्याचा मृत्यू झाला.’


Share this post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *