पोस्टाच्या योजनेत भरा फक्त १०० रुपये आणि मिळवा चांगला नफा.
जर तुम्हीही तुमची बचत बँकेत ठेवत असाल तर तुम्हाला पोस्ट ऑफिसच्या या योजनेची माहिती असणे आवश्यक आहे.
तुम्ही या पोस्टाच्या योजनेमध्ये फक्त 100 रुपयांपासून गुंतवणूक सुरू करु शकता. पोस्ट ऑफिस रिकरिंग डिपॉझिट (RD) मध्ये तुम्ही फक्त 100 रुपयांपासून गुंतवणूक करु शकता. पोस्ट ऑफिसच्या RD मध्ये बँकेच्या RD पेक्षा जास्त व्याज मिळत आहे. सरकारने पोस्ट ऑफिस आरडीवर ऑक्टोबर-डिसेंबरसाठी 6.7 टक्के व्याज ठेवले आहे. ही एक प्रकारची पद्धतशीर गुंतवणूक योजना आहे. ज्यामध्ये तुम्हाला दरमहा एक निश्चित रक्कम जमा करावी लागते. पोस्ट ऑफिस आरडीमध्ये तुम्ही किमान 100 रुपये गुंतवू शकता. ही योजना तुम्हाला किमान पाच वर्षे चालवावी लागेल.
बँका व पोस्ट ऑफिस आरडी यातील देय व्याजाचा तपशील.
यस बँक – 6.50 टक्केएसबीआई – 6.50 टक्केइंडियन ओवरसीज बँक – 6.50 टक्केडीबीएस बँक – 6.50 टक्केइंडसइंड बँक – 6.50 टक्केसाउथ इंडियन बँक – 5.65 टक्केयूनियन बँक ऑफ इंडिया़ – 5.60 टक्केबंधन बँक – 5.60 टक्केकरुर वैश्य बँक – 5.35 टक्केपंजाब नॅशनल बँक – 5.30 टक्केआईडीबीआई बँक – 5.25 टक्केबँक ऑफ महाराष्ट्र – 5.25 टक्केबँक ऑफ इंडिया – 5.25 टक्केकोटक महिंद्रा बँक – 5.20 टक्केसिटी बँक – 3.00 टक्के
अधिक माहितीसाठी जवळील पोस्ट ऑफिसला भेट द्या किंवा अधिकृत वेबसाईटला भेट द्या.
