अपडेटशैक्षणिक

पोषण आहारातील अंड्यासाठी आता, राष्ट्रीय अंडी समन्वय समिती च्या संकेतस्थळावरील दरानुसार अंड्याची रक्कम…

Share this post

केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेतून वार्षिक अंदाजपत्रकाच्या पाच टक्के निधीतून नावीन्यपूर्ण उपक्रमाअंतर्गत विद्यार्थ्यांना अतिरिक्त पूरक पौष्टिक पदार्थ देण्याचा निर्णय झाला. त्यानुसार शालेय पोषण आहारात अंडी व केळीसह इतर स्थानिक फळ द्यायला सुरवात झाली आहे.

नावीन्यपूर्ण उपक्रमाअंतर्गत मंजूर निधीतून २३ आठवड्यासाठी नियमित पोषण आहारासोबत अंडी किंवा केळी देण्याचा निर्णय ७ नोव्हेंबरला झाला. पण, पाच रुपयात अंडे मिळत नसल्याने अनेक विद्यार्थ्यांना अंडे मिळत नव्हते. काही शाळांमध्ये एक अंडे दोन विद्यार्थ्यांना द्यावे लागत होते. त्यामुळे शिक्षक संघटना तसेच महिला बचत गटांनीही त्यासंदर्भात शासनाला निवेदने दिली होती. त्यानुसार अधिवेशन संपताच शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने अंड्याचे दर वाढवून देण्याचा निर्णय घेतला. आता राष्ट्रीय अंडी समन्वय समितीच्या संकेतस्थळावरून अंड्याचे दर पाहून संबंधित जिल्हा परिषदांना तेवढा निधी मिळणार आहे.

२०२३- २४ या आर्थिक वर्षात प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना आता अंडी व स्थानिक फळे देण्याचा निर्णय यापूर्वीच झाला आहे. पण, अंडे किंवा स्थानिक फळ, यासाठी प्रतिविद्यार्थी पाच रुपये खर्च करावेत, अशी अट होती. तेवढ्या रकमेत अंडे येत नसल्याने शाळांसमोर पेच निर्माण झाला होता. त्यावर शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने नवीन आदेश काढून ’राष्ट्रीय अंडी समन्वय समिती’च्या संकेतस्थळावरील दरानुसार अंड्याची रक्कम देण्याचा निर्णय घेतला आहे.


Share this post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *