अपडेटमहाराष्ट्रराष्ट्रीय

पेन्शनधारक जीवन प्रमाणपत्र सादर करण्यासाठी शेवटचे चार दिवस,अन्यथा पेन्शन थांबेल…

Share this post

पेन्शनधारकांसाठी जीवन प्रमाणपत्र सादर करण्याची अंतिम तारीख आता जवळ आली आहे. देशभरातल्या पेन्शनधारकांसाठी नोव्हेंबरचा महिना अत्यंत महत्त्वाचा असतो. या महिन्यात पेन्शनधारकांना त्यांच्या हयातीचा पुरावा सादर करावा लागतो.

नियमांनुसार सुपर ज्येष्ठ नागरिक म्हणजे ८० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना १ ऑक्टोबर ते ३० नोव्हेंबर २०२३ दरम्यान जीवन प्रमाणपत्र सादर करण्याची सुविधा मिळते. त्याच वेळी, ६० वर्षांपेक्षा जास्त वयाच्या ज्येष्ठ नागरिकांनी १ नोव्हेंबर ते ३० नोव्हेंबर २०२३ दरम्यान जीवन प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक असते.

जीवन प्रमाणपत्र म्हणजे काय?केंद्र किंवा राज्य सरकारच्या सर्व पेन्शनधारकांना वर्षातून एकदा जीवन प्रमाणपत्र सादर करणे अनिवार्य असते. पेन्शन घेणारी व्यक्ती हयातीत आहे की नाही हा त्याचा पुरावा असतो. त्यामुळे जरा तुम्ही असे करण्यात अयशस्वी झाल्यास पेन्शन जारी करणारी संस्था अशा पेन्शनधारकांची पेन्शन थांबवते.

नियमांनुसार जर एखादी व्यक्ती जीवन प्रमाणपत्र सादर करण्यास अपयशी ठरते तर तिला डिसेंबर २०२३ पासून पेन्शन मिळणे बंद होईल आणि आपल्या हयातीत असल्याचा पुरावा सादर केल्यावरच पेन्शन पुन्हा सुरू केली जाईल. अशा परिस्थितीत तुम्ही डिसेंबरऐवजी जानेवारीमध्ये जीवन प्रमाणपत्र सादर केल्यास तुम्हाला आधीच्या महिन्याची पेन्शनची थकबाकी मिळेल. त्यामुळे तुम्हाला पेन्शन मिळणे सुरू ठेवायचे असेल, तर नोव्हेंबरच्या अंतिम मुदतीपूर्वी जीवन प्रमाणपत्र आवश्य सादर करा.


Share this post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *