अपडेटआंतराष्ट्रीयक्रीडा

पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये मराठमोळ्या सचिनने रचला इतिहास, गोळा फेकमध्ये मिळवले पदक

Share this post

पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये मराठमोळ्या सचिन खिलारीने गोळाफेक मध्ये शॉटपुट F46 प्रकारात रौप्यपदक जिंकले आहे.

पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये भारताला मिळालेलं हे 21 वे पदक असून तब्बल 40 वर्षांनंतर भारताला गोळा फेकमध्ये पदक मिळालेलं आहे. यापूर्वी 1984 मध्ये भारताने पुरुषांच्या शॉटपुटमध्ये पहिले पदक जिंकले होते.

सचिनने 16.32 मीटरच्या उत्कृष्ट थ्रोसह रौप्यपदक पटकावले. सचिनचे सुवर्णपदक अवघ्या 0.06 मीटरने हुकले. सचिनने दुसऱ्या प्रयत्नातच 16.32 मीटर फेक केली होती. मात्र, त्यात तो यशस्वी होऊ शकला नाही. कॅनडाच्या ग्रेग स्टीवर्टने 16.38 मीटरच्या सर्वोत्तम थ्रोसह सुवर्णपदक जिंकले.

पॅरालिम्पिकच्या इतिहासात शॉटपुटमध्ये पदक जिंकणारा सचिन खिलारी हा केवळ तिसरा भारतीय खेळाडू आहे. यापूर्वी 1984 मध्ये जोगिंदर सिंग बेदीने कांस्यपदक जिंकले होते आणि महिला धावपटू दीपा मलिकने 2016 च्या रिओ पॅरालिम्पिकमध्ये कांस्यपदक जिंकले होते. सचिनने 2023 वर्ल्ड पॅरा ॲथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये पुरुषांच्या शॉटपुट F46 स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले होते. त्याने वर्ल्ड पॅरा ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप 2024 मध्ये आशियाई विक्रमासह सुवर्णपदक जिंकले होते. F46 श्रेणी अशा खेळाडूंसाठी आहे ज्यांच्या हातात कमकुवतपणा आहे, स्नायू कमकुवत आहेत किंवा त्यांच्या हातात हालचाल कमी आहे.

पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये भारत आता पदतालिकेत 21 पदकांसह 19व्या स्थानावर आहे. भारताने आतापर्यंत 3 सुवर्णपदक, 8 रौप्यपदक आणि 10 कांस्यपदक जिंकली आहेत. मागील पॅरालिम्पिक स्पर्धेत 19 पदके जिंकली होती.


Share this post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *