अपडेटआरोग्यराष्ट्रीय

पॅरासिटामोलसह 156 औषधांवर सरकारने आणली बंदी

Share this post

सरकारने एक मोठा निर्णय घेतला त्या निर्णयांमध्ये 156 फिक्स (FSC ) कॉम्बिनेशन या औषधांवर बंदी घातण्यात आलेली आहे यामध्ये अनेक औषधांचा समावेश आहे. ज्या औषधांचा वापर आपण दररोज करत असतो. यामध्ये अँटिबायोटिक्स, पेन किलर आणि काही मल्टीविटामिन्स औषधांचा देखील समावेश आहे.

या औषधांच्या अतिसेवनाने आता मानवाच्या आरोग्य धोका निर्माण होत असल्याचे आढळून आलेले आहे त्यामुळे केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने अधिसूचना जारी करून या औषधांचे उत्पादन आणि विक्री तसेच वितरण ताबडतोब थांबवण्यास सांगितलेले आहे.

सरकारने बंदी घातलेले या एफबीसीएस मध्ये अँटिबायोटिक्स, पेनकिलर, मल्टी विटामिन ताप आणि उच्च रक्तदाबासाठी जी एकत्रित औषधे वापरत होती. त्यांच्यावर बंदी घालण्यात आलेली आहे. ही औषधे तयार करताना इतर काही औषधांचे मिश्रण करून ही औषधे बनवली जात होती. आणि अशा औषधांचा वापर देखील वाढलेला होता. या औषधांना कॉकटेल औषधे असे देखील म्हणतात. यामध्ये दोन वेगवेगळ्या प्रकारचे केमिकल एकत्र आल्याने मानवाच्या आरोग्यावर त्याचा मोठ्या प्रमाणात प्रभाव होत होता. त्यामुळे या सगळ्या औषधावर बंदी घालण्यात आलेली आहे.

प्रमुख FDC औषधांमध्ये मेफेनॅमिक ॲसिड आणि पॅरासिटामॉल इंजेक्शनचा समावेश आहे, ज्याचा वापर विविध परिस्थितींमध्ये वेदना आणि सूज कमी करण्यासाठी केला जातो आणि ओमेप्राझोल मॅग्नेशियम आणि डायसाइक्लोमाइन एचसीएलचा संयोजन डोस, ज्याचा वापर ओटीपोटात दुखण्यावर उपचार करण्यासाठी केला जातो. ओमेप्राझोल मॅग्नेशियम आणि डायसाइक्लोमाइन एचसीएल संयोजन असलेल्या प्रख्यात ब्रँड्समध्ये मॅनकाइंड फार्माचे रानिस्पास आणि झोइक लाइफसायन्सेसचे झेन्सपास यांचा समावेश आहे.

सरकारने असे म्हटले आहे की उक्त एफडीसीच्या वापरामुळे मानवांना धोका होण्याची शक्यता आहे तर या औषधासाठी सुरक्षित पर्याय उपलब्ध आहेत. डीटीएबीला या संयोजन औषधांचे दावे योग्य वाटले नाहीत आणि फायद्यापेक्षा रुग्णाला होणारे नुकसान अधिक आहे हे लक्षात घेऊन निर्णय घेतला, राजपत्र अधिसूचनेत म्हटले आहे. म्हणून मोठ्या सार्वजनिक हितासाठी, औषध आणि सौंदर्य प्रसाधने कायदा 1940 च्या कलम 26A अंतर्गत या FDC चे उत्पादन, विक्री किंवा वितरण प्रतिबंधित करणे आवश्यक आहे.


Share this post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *