पूर्व उच्च प्राथमिक आणि पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा १८ फेब्रुवारीला…
चालू शैक्षणिक वर्षासाठी पूर्व उच्च प्राथमिक आणि पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा १८ फेब्रुवारीला एकाचवेळी होणार आहे.
त्यासाठी परीक्षा परिषदेच्या संकेतस्थळावर ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू आहे. आतापर्यंत राज्यातल्या ३४ हजार ४३२ शाळांमधल्या इयत्ता पाचवीच्या तीन लाख ७७ हजार ८०६, तर इयत्ता आठवीच्या दोन लाख ८२ हजार ४५७ विद्यार्थ्यांनी अर्ज भरले आहेत. नियमित शुल्कासह अर्ज भरण्याची अखेरची मुदत ३० नोव्हेंबरपर्यंत तर विलंब शुल्कासह १५ डिसेंबरपर्यंत मुदत आहे.


