अपडेटपुणे

पुण्यात पावसामुळे शाळांना सुट्टी, गरज असेल तरच घराबाहेर पडण्याचे आदेश

Share this post

हवामान विभागाने पुण्याला आज रेड अलर्ट दिला आहे. या पार्श्वभूमीवर पुण्यातील शाळांना आज सुट्टी देण्यात आली आहे. पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ यांनी ट्विट करत याबाबत माहिती दिली आहे.

मुरलीधर मोहोळ यांनी ट्विट करत म्हंटल की, पुणे शहरातील शाळांना २५ जुलै, २०२४ रोजी सुट्टी ! हवामान विभागाने येत्या काही तासांत पुणे शहर, भोर, वेल्हा, मावळ, मुळशी, हवेली तालुक्यातील खडकवासला परिसरात अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला असल्याने (रेड अलर्ट) या भागातील शाळा २५ जुलै रोजी बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉ. सुहास दिवसे यांनी दिले आहेत. असं ट्विट मोहळ यांनी केल आहे.

येत्या काही तासांत पुणे शहर, भोर, वेल्हा, मावळ, मुळशी, हवेली तालुक्यातील खडकवासला परिसरात अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर खडकवासला धरणातून 40 हजार क्यूसेक्सने पाण्याचा विसर्ग सुरू होत आहे. तसेच पुणे शहराच्या सखल भागात पाणी साचण्याची शक्यता आहे. त्यामुळं नागरिकांनी दक्षता बाळगावी आणि आवश्यकता असेल तरच घराबाहेर पडावे असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. दिवसे यांनी केले आहे.

पुणे शिवाय पश्चिम महाराष्ट्रातील सातारा आणि कोल्हापूर या जिल्ह्यांना सुद्धा आज पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. तसेच मुंबईला आज पावसाचा येलो अलर्ट जारी केला आहे. तर ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी जिल्ह्यांना देखील ऑरेंज अलर्ट दिला आहे.


Share this post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *