पुण्यातील सासवड EVM चोरी प्रकरणी तहसीलदार निलंबित…
पुण्यातील सासवड तहसील कार्यालयातून ईव्हीएम मशीन चोरी झाले होते. यावरच आता निवडणूक आयोगाने मोठी कारवाई केली आहे. निवडणूक आयोगाने याप्रकरणी येथील तहसीलदारांना निलंबीत केलं आहे.
निडवणूक आयोगाने याप्रकरणी एक पत्रक ही जाहीर केलं आहे. यात सांगण्यात आलं आहे, याप्रकरणी आयोगाने संबंधित उपविभागीय अधिकारी, तहसीलदार आणि उपविभागीय पोलीस अधिकारी यांना तात्काळ निलंबित करून त्यांच्याविरुद्ध शिस्तभंगाची कार्यवाही सुरू करण्याचे निर्देश दिले आहेत.
निवडणूक आयोगाने परिच्छेद 6 (अ) मध्ये समाविष्ट असलेल्या प्रशिक्षण आणि जागरूकता स्ट्राँग रूमच्या सुरक्षा प्रोटोकॉलची खात्री न केल्याबद्दल जिल्हा निवडणूक अधिकारी, पुणे आणि पोलिस अधीक्षक (ग्रामीण), पुणे यांच्याकडून स्पष्टीकरण मागवण्याचे निर्देश दिले आहेत.
सासवड शहरातील तहसील कार्यालयातील स्ट्राँग रूममध्ये ईव्हीएम मशीन ठेवण्यात आलेल्या आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, शनिवार आणि रविवारी अशी दोन दिवस तहसील कार्यालयास सुट्टी होती. सोमवारी सकाळी आकरा वाजता तहसील कार्यालयातील अधिकाऱ्यांना स्ट्राँग रूमचं कुलूप तोडण्यात आलेल आढळून आले. या ठिकाणी असलेल्या ईव्हीएम मशीन मधून एक ईव्हीएम मशीन चोरीला गेल्याचं समजताच एकच खळबळ माजली होती.

पोलिसांनी तात्काळ तपास सुरू करत पुणे ग्रामीण पोलिसांनी अवघ्या 24 तासात 2 चोरट्यांनी या प्रकरणी अटक केली. पोलिसांनी या दोन्ही आरोपींना कंट्रोल युनिटसह जेजुरीमधून अटक केली आहे. नेमकी त्यांनी ही चोरी कशासाठी केली याचा तपास सुरू आहे.