पुणे विद्यापीठाच्या इंजिनिअरिंगच्या परीक्षेत गोंधळ, प्रश्नपत्रिका बदलली…
पुणे विद्यापीठातर्फे पुणे,अहमदनगर व नाशिक येथील संलग्न महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची परीक्षा घेतली जात आहे. शुक्रवारी द्वितीय वर्ष इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांचा 2019 पॅटर्नचा इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजीनियरिंग आणि कम्प्युटर इंजिनिअरिंगचा पेपर होता.
विद्यापीठातर्फे सकाळी दहा ते साडेबारा या वेळेत संबंधित विषयांची परीक्षा घेतली जाणार होती. परंतु, सकाळी ९.५० वाजता परीक्षा विभागातील कार्यालयात दूरध्वनीवरून प्रश्नपत्रिकेतील काही प्रश्नाबाबत महाविद्यालय व परीक्षा केंद्रावरून हरकती उपस्थित करण्यात आल्या.
त्यामुळे तांत्रिक कारणास्तव सदरची प्रश्नपत्रिका रद्द करून दुसरी प्रश्नपत्रिका थोड्याच वेळात परीक्षा केंद्रावर पाठविण्यात आली.परिणामी परीक्षा केंद्रावर विद्यार्थ्यांमध्ये गोंधळाचे वातावरण निर्माण झाले.
विद्यापीठाने पहिली प्रश्नपत्रिका रद्द करून थोड्या वेळाने दुसरी प्रश्नपत्रिका पाठवली. त्यानंतर परीक्षा सुरळीतपणे पार पडली.


