पिंपरी चिंचवडच्या आश्रमशाळेतील तीन विद्यार्थ्यांचा इंद्रायणी नदीत बुडून मृत्यू
पिंपरी चिंचवडमधून एक दुर्दैवी घटना घटना समोर आली आहे. पिंपरी चिंचवड शहरातील इंद्रायणी नदी पात्रामध्ये तीन विद्यार्थांचा बुडून मृत्यू झाला. वेदश्री व्यास तपोवन गुरुकुल निवासी आश्रमाचे हे तीनही विद्यार्थी होते. या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, इंद्रायणी नदी पात्रात वेदश्री व्यास तपोवन गुरुकुल निवासी आश्रम शाळेचे जवळपास 50 60 विद्यार्थी आज सकाळी जल पूजनासाठी गेले होते. यावेळी पुजा करत असताना नदीपात्रात एका विद्यार्थ्याला पाण्याचा अंदाज न आल्याने तो बुडू लागला, त्या विद्यार्थ्याला वाचवण्यासाठी इतर दोन विद्यार्थ्यांनी नदीपात्रातील पाण्यात उडी मारली, त्या दरम्यान ते दोन्ही विद्यार्थी देखील बुडाले आहेत.
याबाबतची माहिती मिळताच पिंपरी चिंचवड महापालिकेच्या अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेत शोधकार्य सुरू केले. अग्निशमन दलाने जय दायमा (वय,१९) या विद्यार्थ्याचा मृतदेह बाहेर काढला आहे तर ओंकार पाठक आणि प्रणव पोद्दार ह्या दोन विद्यार्थ्यांचे शोध अजूनही नदीपात्रात युद्ध पातळीवर सुरू आहे. वैद्य श्री व्यास तपोवन गुरुकुल निवासी आश्रमाच्या हलगर्जीपणामुळे आज तीन विद्यार्थ्यांना आपलं प्राण गमाव लागल्याने सर्वत्र संताप व्यक्त होत आहे.
या विद्यार्थ्यांना धोकादायक नदीपात्राजवळ जाण्यासाठी गुरुकुल आश्रमाने कशी काय परवानगी दिली? असा संतप्त सवाल आता नागरिक विचारत आहेत. या दुर्घटनेला कारणीभूत ठरणाऱ्या गुरुकुल निवासी आश्रमच्या संचालकांवर सदोष मनुष्यवादाचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी देखील मागणी होत आहे.