अपडेटउत्तर महाराष्ट्रकोकणपश्चिम महाराष्ट्रमराठवाडामहाराष्ट्रमुंबईविदर्भशैक्षणिक

पाच हजार शाळा दत्तक देणार, शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांची घोषणा…

Share this post

राज्यातील सरकारी शाळांमधील पायाभूत सुविधांमध्ये बदल करुन विद्यार्थ्यांना दर्जेदार सुविधा देण्यासाठी एका उद्योगसमुहाने पाच हजार शाळा दत्तक घेण्याची तयारी दर्शवली आहे अशी माहिती शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी दिली.

ग्रामीण व शहरी भागांतील सर्व जिल्हा परिषद, नगरपालिका आणि महापालिका शाळांची गुणवत्ता वाढविण्यासाठी ‘दत्तक शाळा योजना’ राबविण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. यातून समाजातील दानशूर व्यक्ती, स्वयंसेवी संस्था, व्यावसायिक कंपन्याकडून देणगी घेऊन शाळांतील पायाभूत सुविधांची दर्जावाढ केली जाणार आहे. यामध्ये शाळांच्या इमारतींची डागडुजी, क्रीडा साहित्य, कम्प्युटर लॅब, ऑडिओ व्हिज्युअल लॅब, इंग्लिश लॅब, रोबोटिक लॅब आदी सुविधा देणगीदारांकडून पुरविल्या जाणार आहेत. शाळांनी केलेल्या मागणीनुसार त्यांना ही मदत दिली जाईल. या देणगीदारांना पाच ते दहा वर्षांच्या करारावर शाळा दत्तक दिली जाणार आहे. त्या बदल्यात शाळांना देणगीदारांचे नाव दिले जाणार आहे.

दत्तक शाळा योजनेमध्ये मोठ मोठे उद्योगसमूह सीएसआर निधीच्या माध्यमातून शाळांमध्ये पायाभूत सोयीसुविधा अद्ययावत करून देणार आहेत. या योजनेतून शाळांचे खासगीकरण करण्यात येणार नाही. शाळांमधील पायाभूत सोयीसुविधा अद्ययावत करण्याचा उद्देश आहे’, असेही केसरकर यांनी सांगितले. ‘खासगी उद्योगसमूह दरवर्षी कोट्यवधी रुपये शिक्षणावर खर्च करतात. मात्र त्याचा योग्य वापर होत नाही. यामाध्यमातून थेट शाळांच्या विकासासाठी उद्योगांचा निधी वापरता येणार आहे असे त्यांनी सांगितले.

राज्य सरकारकडून ‘मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा’ अभियानासोबतच दत्तक शाळा योजना, महावाचन उत्सव- महाराष्ट्रातील वाचन चळवळ, माझी शाळा माझी परसबाग, स्वच्छता मॉनिटर टप्पा २ या उपक्रमांचा शुभारंभ राज्यपाल रमेश बैस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत राजभवन येथे आयोजित राज्यस्तरीय कार्यक्रमात ५ डिसेंबरला करण्यात येणार आहे, असेही केसरकर यांनी यावेळी जाहीर केले.


Share this post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *