अपडेटजळगावमहाराष्ट्र

पाकिस्तानला भारतीय नौदलाची गुप्त माहिती देणारा तरुण जळगाव जिल्ह्यातील पाचोऱ्याचा…

Share this post

पाकिस्तानला भारतीय नौदलाची गुप्त माहिती पुरवण्याच्या आरोपातून गुन्हा दाखल करण्यात आलेला गौरव पाटील हा तरूण जळगाव जिल्ह्यातील पाचोर्‍याचा असल्याची माहिती समोर आली आहे.

सध्या ठाण्यात वास्तव्यास असणार्‍या तरुण राज्य दहशतवाद विरोधी पथकाने एक संशयित पाकिस्तानातील गुप्तचर विभागातील हस्तकाला भारतातील प्रतिबंधित क्षेत्रातील गोपनीय व संवेदनशील माहिती देत असल्याची माहिती दहशतवाद विरोधी पथकाला मिळाली होती. त्या अनुषंगाने जळगाव जिल्ह्यातील पाचोरा येथील रहिवाशी गौरव पाटील याला ठाण्यातून अटक करण्यात आली आहे. या त्याचे आयटी चे शिक्षण झाले असून मुंबईच्या नेव्हल डॉक यार्डमध्ये सहा महिन्यांचे शिकाऊ शिक्षण घेतले होते. काल अचानक त्याला अटक करण्यात आल्याने एकच खळबळ उडाली असून याचा त्याच्या पालकांना मोठा धक्का बसला आहे.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार,एप्रिल ते ऑक्टोबर २०२३ च्या काळात गौरव फेसबुकच्या माध्यमातून एका अहमदाबादची सांगणाऱ्या तरुणीच्या संपर्कात आला. परंतू तत्पूर्वी काही दिवस आधीच त्याचे फेसबुक अकाऊंट हॅक झाले होते. त्यावेळी लहान भाऊ विवेकने अकाऊंट कव्हर करून दिले होते. फेसबुकवरून सुरु झालेली चॅटिंग व्हॉट्सअपपर्यंत पोहोचली. त्यानंतर संबंधित तरुणी त्याच्यासोबत फेसबुक कॉलवरूनही बोलत होती. याच काळात तू खरचं नेव्हीमध्ये कामाला आहे का ? असे म्हणून त्याच्याकडून गोड बोलत कामाच्या ठिकाणावरील काही फोटो संबंधित तरुणीने मागवून घेतले. त्यानंतर एकेदिवशी संबंधित तरुणीने दोन हजार त्याला पाठवले. पैसे का पाठवले असावेत म्हणून भेदरलेल्या गौरवने संपर्क साधण्याचा प्रयत्न केला तोपर्यंत त्या मुलीचे फेसबुक अकाऊंट डीएक्टिव्ह झालेले होते.

यानंतर गौरव एटीएस यंत्रणाच्या रडारवर आला. महिनाभर त्याला दररोज बोलावून चौकशी करण्यात आली. त्यानंतर दिवाळीत गौरव घरी आला. सोमवारी त्याला एटीएसमधून पुन्हा बोलावणे झाले. यावेळी गौरवसोबत त्याचे वडीलही गेलेत. परंतू ठाण्याला एटीएस ऑफिसला पोहचल्यावर अधिकाऱ्यांनी गौरवला अटक केल्याची माहिती वडिलांना दिली. गौरव पाटीलला अटक केल्यानंतर न्यायालयात सादर केले असता, न्यायालयाने त्याला एक आठवड्याची पोलिस कोठडी सुनावली. एटीएस अधिकाऱ्यांनी गौरव पाटीलला पाकिस्तानकडून खूप पैसे मिळालेले नाहीत. पण निश्चित रक्कम किती होती, याचा शोध घेण्याचे काम सुरू असल्याचे म्हटले आहे.

या संदर्भात एका वृत्तवाहिनीशी बोलतांना या प्रकरणातील आरोपी गौरव अर्जुन पाटील यांचे वडील म्हणाले की, माझा मुलगा हा निर्दोष आहे. तो अभ्यासात हुशार असून तो सैन्य भरती पोलीस भरतीची तयारी करत होता. त्याला देशाची सेवा करायची असून तो देशाशी गद्दारी कधीच करणार नाही. माझा मुलगा हा पेट्रोल पंपाच्या वर काम करायचा आणि एक दिवस फोन करून त्याला मुंबईला बोलावले आणि अटक केली त्यावेळी मला खूप धक्का बसला अशी माहिती गौरवच्या वडिलांनी दिली आहे. माझा मुलगा निर्दोष असून सरकारने त्याला निर्दोष सोडावे अशी मागणी गौरवच्या वडिलांनी केली आहे.


Share this post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *