अपडेटआरोग्यमहाराष्ट्र

पांढऱ्या रेशन कार्डधारकांनाही मिळणार ५ लाखांपर्यंत मोफत आरोग्य विम्याचा लाभ

Share this post

१ जुलैपासून कोणत्याही शिधापत्रिका धारकांना महात्मा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत पाच लाख रुपयांच्या मोफत आरोग्य विम्याचा लाभ घेता येणार आहे.

यापूर्वी हा आरोग्य विमा, दीड लाख रुपयांचं विमा संरक्षण महाराष्ट्रातील केवळ पिवळ्या आणि केशरी या रेशन कार्ड धारकांसाठी उपलब्ध होतं. या योजनेचा लाभ घेण्यासाठी उत्पन्नाची मर्यादा होती. वार्षिक उत्पन्न एक लाख रुपये असणाऱ्या नागरिकांसाठी ही योजना उपलब्ध होती. मात्र आता १ जुलै २०२४ पासून महाराष्ट्रभरातील पांढऱ्या रेशन कार्डधारकांनाही या आरोग्य विम्याचा लाभ घेता येणार आहे. त्यासाठी पांढरे रेशन कार्ड आपल्या आधार कार्डसोबत जोडण्याचे आदेश देण्यात आले असून यासाठी सर्व जिल्हा पुरवठा अधिकारी, उपनियंत्रक शिधावाटप, सर्व अन्नधान्य वितरण अधिकारी यांना आधार कार्ड आणि रेशन कार्ड जोडणीच्या सूचना राज्यभरात देण्यात आल्या आहेत.

महात्मा फुले जन आरोग्य योजना आणि आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना या दोन योजना एकत्रितपणे राबण्याचा निर्णय २०१९ मध्ये आरोग्य विभागाने घेतला होता. २०२३ मध्ये त्यात सुधारणा करण्यात आली आहे.

आरोग्य विम्याची मर्यादा दीड लाखांवरुन पाच लाख करण्याचं सांगण्यात आलं होतं. मात्र त्याची अंमलबजावणी आता १ जुलैपासून होणार असून सर्व वर्गातील लोकांना, तसंच पिवळ्या आणि केशरी रेशन कार्डधारकांसह पांढरे रेशन कार्डधारकदेखील आता या मोफत आरोग्य योजनेचा लाभ घेऊ शकतात.


Share this post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *