परसबाग निर्मिती स्पर्धेत, अषित प्राथमिक शाळेची तालुकास्तरावर निवड…
देशाच्या प्रगतीसाठी विद्यार्थी हा महत्त्वाचा घटक असतो. विद्यार्थ्यांचा सर्वांगिण विकास होण्यासाठी आहारात उच्च प्रतीचे पोषण घटक अधिक महत्त्वाचे असतात. विविध उद्दिष्ट ठेऊन केंद्र सरकारच्या वतीने प्रधानमंत्री पोषण शक्ती योजना निर्माण करण्यात आली.
सदर योजनेअंतर्गत केंद्रस्तर ते राष्ट्रीय स्तरापर्यंत परसबाग निर्मिती स्पर्धा आयोजीत करण्यात येते.बागेची आकर्षक निर्मिती,सेंद्रिय खतांचा वापर, विविध फळ, पालेभाज्या यांचा नियमितपणे शालेय पोषण आहारात समावेश करणे आदी निकषांचा समावेश आहे.
नुकत्याच झालेल्या परसबाग निर्मिती स्पर्धेत अषित प्राथमिक शाळा पवनी या शाळेची तालुका स्तरावर निवड करण्यात आली आहे.
या निवडमुळे जिल्हा स्तरीय शासकीय टिमचे प्रमुख, अभय निनावे लेखा धिकारी शा.पो.आ., रविंद्र धांदे कृषी विस्तार अधिकारी, ए.डी.मारकेंडवार आरोग्य विभाग, तुकाराम साखरवाडे शा.पो.आ.प्रतिनिधीचालक विनोद दहेकार यांनी भेट देऊन समाधान व्यक्त केले.
परसबाग निर्मितीसाठी शाळेचे मुख्याध्यापक आर.व्ही.बिसने, ए.आर.गिरी, पी.डी.भोयर, एम.एम.जिवतोडे, अर्चना रामटेके, धनश्री मुंडले, प्रमिला बिसने यांनी मोलाचे सहकार्य केले.
