पंतप्रधान मोदींचे तेजस फायटर प्लेनमध्ये उड्डाण..
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी 25 नोव्हेंबर रोजी बंगळुरू येथे तेजस लढाऊ विमानातून उड्डाण केले.पीएम मोदी बंगळुरूच्या येलाहंका एअरबेसवर पोहोचले होते, जिथे त्यांनी स्वदेशी लढाऊ विमान तेजसने उड्डाण केले.तेजस हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड (HAL) ने विकसित केले आहे. हे सिंगल इंजिन हलके लढाऊ विमान आहे. त्याच्या दोन स्क्वॉड्रनचा हवाई दलात समावेश करण्यात आला आहे.
LCA MARK 2 (तेजस MK 2) या हलक्या लढाऊ विमानाचे इंजिन आणि स्वदेशी प्रगत मध्यम लढाऊ विमान (AMCA) चे पहिले दोन स्क्वॉड्रन आता देशात तयार केले जातील. भारतातील संरक्षण क्षेत्र मजबूत करण्यासाठी हा निर्णय अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे.
संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (DRDO) प्रमुख डॉ. समीर व्ही. कामत यांनी शनिवारी (18 नोव्हेंबर) सांगितले होते की अमेरिकन कंपनी GE एअरोस्पेस आणि हिंदुस्तान एअरोनॉटिक्स लिमिटेड (HAL) संयुक्तपणे ही इंजिने बनवतील.
