न.प.पवनी केंद्राअंतर्गत क्रीडा स्पर्धेत, अषित प्राथमिक शाळा अव्वल…
विद्यार्थ्यांचा सर्वांगिण विकास व्हावा यासाठी जिल्हा परिषद शिक्षण विभाग भंडारा यांच्या वतीने यावर्षी प्रथमच प्राथमिक स्तरावरील सर्व विद्यार्थ्यांचे क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले. नगर परिषद पवनी केंद्राअंतर्गत एकुण दहा शाळांनी सहभाग घेतला.
झालेल्या चुरशीच्या सामन्यात अषित प्राथमिक शाळा पवनी यांनी कबड्डी,खो-खो,लांब उडी क्रीडा स्पर्धेत मुले आणि मुली यांनी प्रथम क्रमांक पटकावला असुन पुढे तालुका स्तरावर ग्राम शिवनाळा येथे कौशल्य दाखविणार आहेत.
क्रिडा स्पर्धेतील यशाबद्दल सर्व स्तरातून विद्यार्थ्यांचे कौतुक व अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.संघ यशस्वी होण्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक आर.व्ही.बिसने,ए.आर. गिरी,पी.डी.भोयर,एम.एम.जिवतोडे यांनी अथक परिश्रम घेतले.
