नोकरी मिळवून देतो, म्हणणाऱ्या तोतयांपासून सावध राहावे – शिक्षण आयुक्त सूरज मांढरे
राज्याच्या शालेय शिक्षण विभागातर्फे पवित्र पोर्टलच्या माध्यमातून शिक्षक भरती प्रक्रिया राबवली जात आहे. शिक्षण विभागातर्फे राज्यातील कोणत्याही कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी किंवा अशासकीय व्यक्तीची शिक्षक भरतीसाठी माध्यम म्हणून नियुक्ती केलेली नाही. त्यामुळे नोकरी मिळवून देतो, असे सांगून फसवणूक करणाऱ्या इसमानपासून तसेच तोतयागिरी पासून उमेदवारांनी सावध राहावे, असा स्पष्ट सूचना राज्याचे शिक्षण आयुक्त सुरज मांढरे यांनी दिला आहे.
पवित्र पोर्टलच्या माध्यमातून शिक्षक भरती 2022 ची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.उमेदवारांनी पसंतीक्रम भरण्यास सुरुवात केली असून सर्वांना पसंतीक्रम भरता यावे म्हणून शिक्षण विभागाने 12 फेब्रुवारीपर्यंत पसंतीक्रम भरण्यास मदत वाढ दिली आहे. उमेदवारांना पोर्टल बाबत कोणत्याही समस्या किंवा अडचणी आल्यास या ईमेल करण्याचे आवाहन केले आहे. तसेच पोर्टलवरील अपडेटसाठी व आपल्या समस्यांचे निराकरण होण्यासाठी पोर्टलवर प्रसिद्ध होणाऱ्या सूचना दैनंदिन न्यूज बुलेटीन आणि शासन निर्णयातील तरतुदी इत्यादी बाबी तपासून पहाव्यात, असे आवाहन शिक्षण विभागाने केले आहे.
शिक्षण विभागातर्फे काही वर्षांनंतर शिक्षक भरतीची प्रक्रिया राबवली जात आहे. त्यामुळे काही ठगांकडून उमेदवारांची फसवणूक करण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळेच नोकरी मिळून देतो, असे सांगून फसवणूक करणाऱ्यांपासून तसेच तृतीया गिरी पासून उमेदवारांनी सावध राहावे अशा सूचना शिक्षण आयुक्त सुरज मांढरे यांनी दिल्याचे दिसून येत आहे.
