नेपाळमध्ये भूकंप बचावकार्य युद्ध पातळीवर सुरू…
6.4 रिश्टर स्केल तीव्रतेच्या या भूकंपानं नेपाळमधील जाजरकोट आणि रुकुम पश्चिम या भागात मोठी जीवितहानी.
जाजरकोट आणि रुकुम पश्चिम या दोन जिल्ह्यांमध्ये भूकांपामुळे सर्वात जास्त नुकसान झाले आहे. तिथे बचाव कार्य आणि शोध मोहीम वेगाने सुरू आहे. बचाव कार्यासाठी पोलीस, लष्कर आणि सशस्त्र दल तैनात केले असून, बचावकार्यासाठी हेलिकॉप्टरचाही वापर केला जातोय.

लष्कर दलाच्या प्रवक्त्याने माहिती देताना सांगितलं की, 100 हून अधिक लोक जखमी झाले असून जाजरकोट येथील रुग्णालयात मोठ्या संख्येने जखमी लोक दाखल करण्यात आले आहेत.मध्यरात्री खूप जोरदार हादरा जाणवला त्यामुळे लोकांनी घराबाहेर सुरक्षित ठिकाणी आसरा घेतला. मातीच्या शेकडो घरांचं नुकसान झालंय. आम्ही बचाव आणि मदत कार्यात गुंतलो आहोत.

भूकंपामुळे झालेल्या जीवित आणि मालमत्तेच्या हानीबद्दल नेपाळचे पंतप्रधान पुष्प कमल दहल यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर दु:ख व्यक्त केलं आहे. तसेच त्यांनी शनिवारी या प्रदेशात दौरा करत तातडीने बचावकार्य करण्याचे आदेश दिले आहेत.

Hope the survivors are rescued on time.
— Nepal Earthquake (@NepalEarthquake) November 4, 2023
Scores reported dead as 6.4M #NepalQuake jolts Jajarkot https://t.co/EGgbsG9sfJ via @kathmandupost

