अपडेटआर्थिकराजकारणराष्ट्रीय

निवडणूक रोख्यांतून (Electroal Bonds) कोणत्या पक्षाला किती कोटी मिळाले…

Share this post

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार स्टेट बँक ऑफ इंडियाने निवडणूक आयोगाला निवडणूक रोख्यांचा तपशील सादर केल्यावर आयोगाने गुरुवारी रात्री हा तपशील आपल्या वेबसाइटवर प्रसिद्ध केला. या माहितीनुसार, प्रादेशिक पक्षांना एप्रिल २०१९ ते जानेवारी २०२४ या कालावधीत निवडणूक रोख्यांद्वारे ५,२२१ कोटी रुपये देणग्यांच्या स्वरूपात प्राप्त झाले.

याच काळात एकट्या भाजपला या माध्यमातून याहून ८३९ कोटींनी अधिक म्हणजे ६,०६० कोटी रुपये मिळाल्याचे समोर आले.

निवडणूक आयोगाने खरेदीदार आणि लाभार्थी पक्ष अशा दोन भागांमध्ये ही माहिती प्रसिद्ध केली आहे. काँग्रेसला १,४२१.८६ कोटी रुपये, तर आम आदमी पक्षाला ६५.४५ कोटी रुपयांचा लाभ देणग्यांचा स्वरूपात मिळाला.

बहुजन समाज पक्ष, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष आणि नॅशनल पीपल्स पक्ष या अन्य राष्ट्रीय पक्षांना निवडणूक रोख्यांद्वारे कोणताही निधी मिळालेला नाही.

प्रादेशिक पक्षांमध्ये तृणमूल काँग्रेसला सर्वाधिक निधी रोख्यांद्वारे मिळाल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होते. तृणमूल काँग्रेसला रोख्यांद्वारे १,६०९.५३ कोटी रुपये प्राप्त झाले. ही रक्कम २२ प्रादेशिक पक्षांना मिळालेल्या देणग्यांच्या ३० टक्के आहे. महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष, जम्मू-काश्मीर नॅशनल कॉन्फरन्स आणि गोवा फॉरवर्ड पक्ष यांना रोख्यांद्वारे एक कोटीहून कमी देणग्या मिळाल्या.

महाराष्ट्रातील पक्षांना मिळालेला निधी (कोटी रुपयांत)- शिवसेना – १५९.३८- राष्ट्रवादी काँग्रेस – ३१

अन्य पक्षांना मिळालेला निधी (कोटी रुपयांत)- भारत राष्ट्र समिती – १२१४.७०- बिजू जनता दल – ७७५.५०- द्रमुक – ६३९- वायएसआर काँग्रेस – ३३७- तेलगू देसम – २१८.८८- राष्ट्रीय जनता दल ७३.५- जनता दल (धर्मनिरपेक्ष) – ४३.४०- सिक्कीम क्रांतिकारी पक्ष – ३६.५- जनसेना पक्ष – २१- समाजवादी पक्ष – १४.०५- जनता दल (संयुक्त) १४- झारखंड मुक्ती मोर्चा – १३.५ कोटी- अकाली दल ७.२- अण्णा द्रमुक – ६.०५- सिक्कीम डेमोक्रेटिक फ्रंट ५.५


Share this post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *