अपडेटउत्तर महाराष्ट्रनाशिकशैक्षणिक

नाशिक शिक्षक मतदारसंघातील उमेदवारांकडून मिळालेल्या पैठणी आणि नथ जाळून महिला शिक्षिकांनी नोंदविला निषेध.

Share this post

नाशिक शिक्षक मतदार संघाची निवडणूक सुरू असून मतदार संघात अनेक नाट्यमय घडामोडी घडत आहे. २६ जून रोजी मतदान होणार आहे. तत्पूर्वी काही उमेदवारांकडून शिक्षक मतदारांना घरातील महिलांसाठी पैठणी आणि नथ देण्यात आणि पाकिट देण्यात आले.

मंगळवारी नाशिक येथे महिलांनी या पैठणी आणि नथ जाळून मत विकत घेऊ पाहणाऱ्या प्रवृत्तीचा निषेध व्यक्त केला आहे. शिक्षक हे ज्ञानदानाचे पवित्र कार्य करीत असून शिक्षकांना व कुटुंबीयांना पैठण्या आणि इतर साहित्य देऊन गुलाम बनवण्याचा प्रयत्न सुरू असून या गोष्टींचा आम्ही निषेध करतो, अशा शब्दात महिला शिक्षिकांनी आणि शिक्षक पत्नी यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

कपडे, साड्या नथ वाटप करुन शिक्षक विकत मिळतो अशी भावना असणाऱ्या उमेदवारांना हा चाप देण्याचा काम या घटनेमुळे झाले.


Share this post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *