अपडेटमहाराष्ट्रशैक्षणिक

नामांकित संस्थेच्या शाळा बंद,यु-डायस वरून नाव हटवण्याचे आदेश…

Share this post

संस्था चालक मोठ्या उत्साहाने इंग्रजी व मराठी माध्यमाच्या शाळा सुरू करतात. मात्र, मागील दोन वर्षांपासून या शाळांमध्ये एकही विद्यार्थ्यांने प्रवेश घेतलेला नाही. त्यामुळे या शाळा शून्य पाटाच्या असल्याचे शिक्षण विभागाने घोषित केले आहे. आता या शाळांची नावे यु-डायस पोर्टलवरून हटवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

या शाळांमध्ये जी.जी. इंटरनॅशनल स्कूल, डी. वाय. पाटील इंटरनॅशनल स्कूल, पी.जोग यासह दौंड तालुक्यातील समाज कल्याण विभागाच्या शाळेचाही समावेश आहे. दौंड, हवेली, मुळशी ,शिरूर ,वेल्हे या तालुक्यासह औंध, बिबवेवाडी, हडपसर, पिंपरी येथे शून्य पटाच्या शाळा आहेत. यातील बहुतांश शाळांमध्ये मागील वर्षी आणि या वर्षी एकाही विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतलेला नाही.त्यामुळे अशा शाळांची नावे यु-डायस पोर्टलवरून काढून टाकावी, असे आदेश पुणे विभागीय शिक्षण उपसंचालक राजेंद्र अहिरे यांनी संबंधित शिक्षण अधिकाऱ्यांना दिले आहेत.

केंद्र शासनातर्फे यु-डायसवर उपलब्ध असलेल्या माहितीच्या आधारावर संबंधित राज्याची शैक्षणिक गुणवत्ता तपासली जाते. त्यात यु-डायसवर शून्य पटाच्या शाळा दिसत असतील तर आपोआपच राज्याच्या शैक्षणिक मूल्यांकनावर परिणाम होतो. त्यामुळे या शाळा यू-डायस पोर्टलवरून काढून टाकण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.- राजेंद्र अहिरे, पुणे विभागीय शिक्षण उपसंचालक


Share this post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *