नांद्रा ता.पाचोरा येथे सेंद्रिय शेती व आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य विषयी कार्यशाळा उत्साहात संपन्न…
नांद्रा येथे कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ संचलित आजीवन अध्ययन व विस्तार विभाग व केवलाई फाउंडेशन, पाचोरा यांच्या संयुक्त विद्यमाने शेतकरी सहायता उपक्रम अंतर्गत सेंद्रिय शेती व आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य या विषयावर कार्यशाळा आज रोजी नांद्रा येथील प्रगतिशील शेतकरी सुरेश शामराव सूर्यवंशी यांच्या शेतात संपन्न झाली.
या कार्यशाळेचे उद्घाटन कबचौउमविचे व्यवस्थापन परिषद सदस्य ॲड.अमोल नाना पाटील (भडगाव) यांच्या हस्ते संपन्न झाले. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून पाचोरा कृषी कार्यालयाचे कृषी पर्यवेक्षक श्री. यु.आर.जाधव, नांद्रा भागाचे कृषी सहाय्यक श्री. चेतन बागुल, नांद्रयाचे आदर्श शेतकरी,विश्वनाथ लोटन सूर्यवंशी, उपसरपंच शिवाजी तावडे, बापू सूर्यवंशी सर, ॲड.निलेश तिवारी हे उपस्थित होते.
याप्रसंगी कृषी पर्यवेक्षक श्री.यु.आर. जाधव यांनी सेंद्रिय शेती काळाची गरज असल्याची सांगून आता मनुष्याला आपल्या आहारामध्ये आपल्या दैनंदिन जीवनात गहूच्या ऐवजी धान्य मध्ये ज्वार बाजरी पिकाचा नियमित वापर खाण्यासाठी करण्याचे गरजेचे असल्याचे आपल्या मनोगतातून सांगितले. अध्यक्षीय मनोगत व्यक्त करतांना विद्यापीठाच्या आजीवन अध्ययन व विस्तार विभागाच्या माध्यमातून राबविण्यात येत असलेल्या विविध समाजोपोयगी उपक्रमांची माहिती व्य.प.सदस्य ॲड.अमोल पाटील यांनी दिली.
याप्रसंगी गावातील विश्वनाथ लोटन सूर्यवंशी,अनिल दादा तावडे, साहेबराव वामन तावडे,मधुकर शंकर सूर्यवंशी,सखाराम तुकाराम पाटील,ज्ञानेश्वर बाजीराव पाटील,विनोद आप्पा बाविस्कर,पिंटू आप्पा बोरसे, सोनू सूर्यवंशी,शिवाजी आप्पा तावडे हिरालाल सूर्यवंशी,माधव हिरामण पाटील, महेश गवादे,हरीश गवादे, एकनाथ खंडू बाविस्कर, अनिल दादा तावडे,पंकज बाविस्कर, संजू पाहुणे, अनिल शामराव सूर्यवंशी,ज्ञानेश्वर बाजीराव पाटील, पत्रकार राजेंद्र पाटील, पत्रकार प्रा. यशवंत पवार व गावातील शेतकरी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. यशवंत पवार यांनी केले तर आभार प्रदर्शन केवलाई संस्थेचे अध्यक्ष श्री. आबा पाटील सर यांनी केले.

