अपडेटमहाराष्ट्रराष्ट्रीय

नवीन व्यवसायासाठी सुरू करण्यासाठी सरकार 50 हजारपर्यंत कर्ज आणि सबसिडी देणारं…

Share this post

अनेकांना स्वतःचा व्यवसाय सुरु करण्यची इच्छा असते, खास करून तरुण पिढीला कोणाच्याही हाताखाली काम करण्यापेक्षा स्वतःच इतरांसाठी नोकरीच्या संधी उपलब्ध करून द्याव्यात असं वाटत आणि म्हणूनच ते व्यवसायिक क्षेत्रात उतरतात. सरकार देखील अश्या तरुणांना मदत करण्यासाठी वेळोवेळी प्रयत्नशील असते आणि वेगवेळ्या योजना राबवत गरजू आणि महत्वकांक्षी लोकांना मदत करते.

केंद्र सरकार सध्या स्वयंरोजगाराला चालना देण्यासाठी नवीन योजना घेऊन आलंय. या योजनेचा वापर करून लोकं अगदी सहजपणे नवीन व्यवसायला चालना देऊ शकतात. हि योजना खास करून रस्त्यावर काम करणाऱ्या विक्रेत्यांसाठी बनलेली आहे ज्यांना या योजनेद्वारे सरकार आर्थिक मदत पोहोचवणार आहे. या योजनेचे नाव PM SVANidhi Yojana असे असून कोविडच्या काळात म्हणजेच 2020 मध्ये या योजनेची सुरुवात झाली होती. सरकारकडून व्यवसाय करू पाहणाऱ्याला योजनेंतर्गत 10 हजार ते 50 हजार रुपयांपर्यंत कर्ज दिलं जातं.

योजनेत सर्वात आधी तुम्ही 10 हजार रुपयांच्या कर्जासाठी पात्र ठरता, कर्जाची रक्कम परत करण्यासाठी सरकारने एका वर्षाचा कालावधी निश्चित केला आहे. हे कर्ज जर का तुम्ही यशस्वीपणे परत करू शकलात तरच पुढच्यावेळी तुम्हाला 20 हजार रुपयांचे कर्ज मिळेल आणि त्यानंतर तुम्ही 50 हजार रुपयांपर्यंत कर्ज मिळवण्यासाठी पात्र ठराल.

कर्जाची परतफेड केल्यास 7 टक्के सबसिडी दिली जाते आणि हीच या योजनेला इतरांपेक्षा उजवी ठरवते. सरकारने डिजिटल पेमेंटला ( Digital Payment) ला प्रोत्साहन देण्यासाठी योजनेत कॅशबॅकची सुविधाही जोडलेली आहे. जर कर्ज धारकाने PM SVANidhi Yojana अंतर्गत डिजिटल पेमेंटचा वापर केला तर त्याला 25 रुपयांपेक्षा जास्त कॅशबॅकचा लाभ मिळेल. अशा परिस्थितीत, कर्ज घेणारा माणूस एका महिन्यात 100 रुपयांपर्यंत कॅशबॅक मिळू शकतो. आतापर्यंत या योजनेच्या लाभार्थ्यांची संख्या 70 लाखांपेक्षा अधिक झाली आहे, त्यामुळे वेळ न दवडता तुम्ही देखील या योजनेचा भाग बनू शकता.


Share this post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *