देशात नवरात्रोत्सवाला उत्साहात सुरुवात.
महाराष्ट्रातल्या साडेतीन शक्तीपिठांसह,समस्त महराष्ट्रात देवीची पूजाअर्चा सुरू झाली आहे.
आपल्या देशात महाराष्ट्र राज्यात देवींचे साडे तीन शक्तिपीठं आहेत. दर वर्षी इथे नवरात्रात फार गर्दी उसळते, कोल्हापूर, तुळजापूर, माहूरगड आणि नाशिकची सप्तश्रृंगी देवी. हे सर्व शक्तिपीठं तीर्थक्षेत्र असून नवसाला पावणारे आहेत. कारण हे सगळे स्थळ जागृत आहेत. यांच्याशी निगडित बऱ्याच आख्यायिका आहेत. इथे भाविक आपापल्या इच्छा घेऊन येतात आणि या शक्ती पीठांना भेट देतात. इथे नवरात्रात खूप गर्दी असते.
महालक्ष्मी –
कोल्हापुरातील महालक्ष्मी म्हणजेच आपली अंबाबाई हे सर्वात जुने देऊळ असून या मंदिराचे किंवा देऊळाचे बांधकाम राष्ट्रकूटांनी किंवा त्या आधी पासूनच शिलाहार राजांनी आठव्या शतकात केले होते. पुराणात याचा उल्लेख 108 पीठांपैकी एक आणि महाराष्ट्रातील साढे तीन शक्तिपीठांपैकी एक असे केलेले आहेत. कोल्हापूरची अंबाबाईला महाराष्ट्राची कुलस्वामिनी म्हणतात.
तुळजाभवानी –
तुळजापुरातील तुळजाभवानीचे तीर्थक्षेत्र हे पूर्ण आणि आद्यपीठ मानले जाते. इथे तुळजाभवानीचे प्राचीन देऊळ असून हे महाराष्ट्रातील उस्मानाबाद जिल्ह्यात वसलेले आहे. पुराणानुसार असुरांचा संहारकरून धर्माचरण आणि नीतीची पुनर्स्थापना करण्याचे कार्य देवी आईने केले आहे. स्वराज्य हिंदवीचे संस्थापक छत्रपती श्री शिवाजी महाराज भोसले यांची कुलदेवी देखील हीच तुळजाभवानी आहे.
रेणुका देवी –
माहूर गडाची रेणुका देवी ही महाराष्ट्रातील अनेक परिवारांची कुलदेवी आहे. ही साढे तीन शक्तिपीठांपैकी एक आहे. माहूर गड हे एक जागृत तीर्थ क्षेत्र आहे. माहूरगडावर रेणुके तसेच दत्तात्रय आणि परशुराम यांची देखील देऊळे इथे आहे. या देवीचं देऊळ यादव काळातील राजानी बांधले असे. आख्यायिका आहे की दत्तात्रयांचा जन्म देखील याच माहूर गडावर झाला.
सप्तशृंगी देवी –
या देवीचे तीर्थक्षेत्र महाराष्ट्रातील साडेतीन पीठांपैकी अर्ध पीठ म्हणून ओळखले जाते. ही सप्तशृंगी देवी नाशिक पासून 65 किलोमीटर वर 4800 फूट उंचीवर सप्तशृंगगडावर वास्तव्यास आहे. निसर्गाच्या सानिध्यात असलेली ही सप्तशृंग गडावरील सप्तशृंगी देवी उभ्या रूपात आहे. या मागील अशी आख्यायिका आहे की महिषासुर मर्दन करण्यासाठी देवी देवांनी त्याची याचना केली त्यामुळे देवी होमातून प्रकट झाली. तिचे हेच रूप म्हणजे सप्तशृंगीचे होते.