देशभरात नववर्षाचे जल्लोषात स्वागत…
भारतासह इतर अनेक देशांमध्ये रात्री १२ वाजल्यापासून नव्या वर्षाला सुरूवात झाली. देशातील कानाकोपऱ्यात नववर्षाचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. ३१ डिसेंबरच्या रात्री फटाक्यांच्या आतषबाजीसह लोकांनी नवीन वर्षाचे स्वागत केले. अनेक शहरांमध्ये लोकांनी जोरदार पार्टी केली. दिल्लीपासून ते मुंबईपर्यंतचे रेस्टॉरंट, हॉटेल्स, पब फुल्ल झाले होते. रोडवरही उतरून लोकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी करत नवीन वर्षाचे स्वागत केले.
नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी सोमवारी सकाळी मंदिरांमध्ये भक्तांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. दिल्लीच्या लोधीरोड स्थित साई मंदिरात २०२४मधील पहिली आरती झाली. मुंबईतील सिद्धीविनायक मंदिरातही पहिल्या काकड आरतीसाठी भाविकांनी मोठी गर्दी केली.पंजाबच्या अमृतसर मंदिरातील सुवर्ण मंदिरात पहिल्या दिवशी भक्तांनी दर्शन घेतले. कनॉट प्लेसच्या प्राचीन हनुमान मंदिरातही सकाळी सकाळी आरती करण्यात आली. मध्य प्रदेशच्या उज्जैनस्थित महाकालेश्वर मंदिरात पहिली भस्म आरती करण्यात आली. आंध्र प्रदेशच्या तिरूपतीमध्ये तिरूमला देवस्थानमने नव्या वर्षानंतर बालाजी मंदिराची सजावट केली होती.तामिळनाडूच्या रामनाथपुरममध्ये नव्या वर्षाची सुरूवात रामेश्वरमच्या चर्चमधील विशेष प्रार्थना आयोजित करून करण्यात आली. देशाच्या विविध कानाकोपऱ्यात लोकांनी नवीन वर्षाची पहिली सकाळी खूपच भक्तिभावाने केली.

