अपडेटजळगावदुःखद घटनादुर्घटना

देव दर्शनाला गेलेल्या जळगावच्या भाविकांवर नेपाळमध्ये काळाचा घाला

Share this post

नेपाळमध्ये शुक्रवारी एक मोठा अपघात झाला. भारतातील काही भाविकांना घेऊन जाणारी बस तनहुन जिल्ह्यातील मर्स्यांगडी नदीत कोसळली. या अपघात मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या वाढली आहे. मृतांचा आकडा हा २७ वर पोहोचला आहे. यात जळगाव जिल्ह्यातील भाविकांची मोठी संख्या आहे. तर काही नागरिक अद्याप बेपत्ता आहे.

भुसावळ तालुक्यातील वरणगाव, पिंपळगाव आणि तळवेल परिसरातील भाविक देव दर्शन करण्यासाठी गेले होते. ११० जणांचे हे ग्रुप होते. भाविक प्रयागराजपर्यंत ट्रेनने गेल्यानंतर तेथून त्यांनी गोरखपूरच्या केसरवाणी टूर अ‍ॅण्ड ट्रॅव्हल्स एजन्सीच्या बस बुक केल्या होत्या. १६ ते २८ ऑगस्टपर्यंत त्यांचा प्रवास ठरला होता.

युपी53 एफ.टी.7623 ही भाविकांना घेवून पोखराकडून काठमांडूकडे जात असताना चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने बस थेट नदीत कोसळली. या अपघातात २७ भाविकांचा मृत्यू झाला. तर १७ जणांना वाचवण्यात यश आले. दरम्यान, यातील काही भावीक बेपत्ता असल्याचे सुद्धा समजते असून मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. बस जिथे पडली ते ठिकाण डोंगराच्या खाली असल्याने बचावकार्यात अडचणी येत होत्या.

पावसामुळे व नदीच्या वेगवाने प्रवाहामुळे मदतकार्यात अडथळे निर्माण झाले आहेत. नेपाळच्या लष्करी हेलिकॉप्टरची मदत घेण्यात आली. जखमींची प्रकृती चिंताजनक असून, त्यांना उपचारासाठी हवाईमार्गे काठमांडूला हलवण्यात आले आहे.


Share this post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *