अपडेटमुंबईराजकारण

देवेंद्र फडणवीस यांना, कोयासन विद्यापीठाकडून मानद डॉक्टरेट प्रदान…

Share this post

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा जपानमधील विद्यापीठाच्यावतीने गौरव करण्यात आलाय. जपानमधील कोयासन विद्यापीठाकडून देवेंद्र फडणवीस यांना मानद डॉक्टरेट प्रदान करण्यात आली.

पायाभूत सुविधा, औद्योगिक विकास, जलसंधारण, सामाजिक समानतेसाठी केलेल्या कार्याबद्दल त्यांना डॉक्टरेट प्रदान करण्यात आला. कोयासन विद्यापीठाच्या १२० वर्षाच्या इतिहासात मानद डॉक्टरेट प्राप्त करणारे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पहिले आहेत.कोयासन विद्यापीठाचे प्रा. इन्युई रुनिन, वाकायामा प्रांताचे आंतरराष्ट्रीय व्यवहार विभागाचे संचालक यामाशिता योशियो, जपानचे मुंबईतील वाणिज्यदूत डॉ. फुकाहोरी यासुकाता हे कार्यक्रमास उपस्थित होते.तसेच यावेळी उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू रवींद्र कुलकर्णी आणि मुंबईचे पालकमंत्री दीपक केसरकर हे देखील उपस्थित होते.

देवेंद्र फडणवीस हे २०१५ मध्ये जपान दौर्‍यावर गेले होते. त्यावेळी कोयासन विद्यापीठात त्यांनी महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे अनावरण केले होते. त्यानंतर २०१८ आणि २०२३ मध्ये त्यांनी जपानला भेट दिली होती.

डॉक्टरेट मिळाल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी जपानी भाषेत विद्यापीठाचा गौरवोद्गार काढले. मला अतिशय आनंद आहे, की मी दिक्षा भूमीच्या शहरातून येतो. कोयासन विद्यापीठाने मला डॉक्टरेट पदवीने जो बहुमान दिला आहे त्याबाबत मी मनापासून आभार मानतो. २०१५ साली जपानमधील विद्यापीठात डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा स्थापित करता आला.


Share this post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *