देवगड समुद्रकिना-यावर पुण्यातील चार विद्यार्थी बुडाल्याची दुर्घटना…
पुण्यातील पिंपरी-चिंचवड येथील सैनिक अकॅडमीचे ६ विद्यार्थी देवगडच्या समुद्रात बुडाल्याची माहिती आहे. पर्यटनासाठी गेलेल्या पुण्यातील विद्यार्थ्यांच्या बाबती समुद्रकिना-यावर मोठी दुर्घटना घडली आहे.सुमारे ३५ विद्यार्थी सहलीसाठी गेले होते. यापैकी चार विद्यार्थ्यांचे मृतदेह सापडले असून एकावर देवगड ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत, तर एकाचा शोध सुरू आहे.
सर्व विद्यार्थी पुण्यातील खासगी सैनिक अकॅडमीचे असून. मृत्यू झालेल्यांमध्ये चार मुलींचा समावेश आहे. प्रेरणा डोंगरे, अंकिता गालटे, अनिशा पडवळ, पायल बनसोडे अशी मृत मुलींची नावे आहेत.तर राम डिचोलकर हा विद्यार्थी बेपत्ता आहे. देवगडच्या समुद्रकिना-यावर दुपारी तीन ते चार वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. सैनिक अकॅडमीची ३५ जणांची सहल देवगड येथे आली होती. समुद्रात आंघोळीसाठी पाच जण उतरले होते. त्यावेळी पाचजण बुडाले आहेत.
