अपडेटराष्ट्रीय

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना ED कडून समन्स, 21 डिसेंबरला हजर राहण्याचे निर्देश…

Share this post

दिल्लीतील कथित दारू घोटाळ्याप्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने (ED) दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना पुन्हा एकदा समन्स बजावले आहे. ईडीने चौकशीला हजर राहण्यासाठी समन्स बजावण्याची ही दुसरी वेळ आहे. ईडीने त्यांना 21 डिसेंबर रोजी समन्समध्ये हजर राहण्यास सांगितले आहे. यापूर्वी 2 नोव्हेंबर रोजी ईडीने दारू घोटाळ्याप्रकरणी समन्स जारी केले होते. मात्र विधानसभा निवडणुकीच्या कार्यक्रमात व्यस्त असल्याने ते जाऊ शकले नाही.

ईडीने आरोपपत्रात अनेकवेळा अरविंद केजरीवाल यांच्या नावाचा उल्लेख केला आहे. न्यायालयात दाखल केलेल्या आरोपपत्रात ईडीने म्हटले आहे की, दिल्ली धरू धोरण धोरण 2021-22 हे आम आदमी पार्टीच्या प्रमुख नेत्यांनी सतत बेकायदेशीरपणे पैसे कमवण्यासाठी बनवले होते. बेकायदेशीर आणि गुन्हेगारी कारवायांना चालना देण्यासाठी हे धोरण जाणूनबुजून तयार करण्यात आले, असा दावा ईडीने केला आहे.


Share this post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *