दहावी-बारावीच्या प्रॅक्टिकल परीक्षेबाबत राज्य शिक्षण मंडळाचा मोठा निर्णय, शिक्षक व मुख्याध्यापकांचे काम वाढले…
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या इयत्ता दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांचे प्रॅक्टिकल परीक्षेचे गुण ओएमआर (OMR) सीटवर न भरता ऑनलाईन पद्धतीने (Online method) भरण्याचा निर्णय राज्य मंडळाने घेतला आहे., त्यामुळे मंडळाच्या www.mahahssboard.in या संकेतस्थळावरील ‘प्रॅक्टिकल मार्क अँड ग्रेड’ या लिंक मधून प्रचलित लॉगिन आयडी व पासवर्डचा वापर करून शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांना विद्यार्थ्यांचे प्रॅक्टिकल ,तोंडी व अंतर्गत मूल्यमापन परीक्षेचे गुण मंडळाकडे जमा करावे लागणार आहेत.
राज्य मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांनी राज्य मंडळाच्या संकेतस्थळावर याबाबतचे सविस्तर परिपत्रक जाहीर केले आहे. त्यामुळे फेब्रुवारी मार्च 2024 मध्ये होणाऱ्या परीक्षांसाठीचे गुण शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांमधील शिक्षकांना व प्राचार्यांना ऑनलाइन पद्धतीने भरावे लागणार आहेत.
प्रात्यक्षिक तोंडी श्रेणी अंतर्गत मूल्यमापन परीक्षा नियमित कालावधीमध्ये देऊन शकलेल्या विद्यार्थ्यांसाठी सदरची परीक्षा आऊट ऑफ टर्न लेखी परीक्षेनंतर राज्य मंडळांनी कळविलेल्या वेळापत्रकानुसार आयोजित करण्यात येणार आहे नियमित कालावधीमध्ये जे विद्यार्थी गैरहजर राहिले आहेत, अशाच विद्यार्थ्यांचे बैठक क्रमांक आऊट ऑफ टर्न परीक्षेसाठी ज्या त्या कनिष्ठ महाविद्यालयांना व शाळांना उपलब्ध करून दिले जाणार आहेत. या विद्यार्थ्यांचे गुण सुद्धा ऑनलाईन पद्धतीनेच नोंदवावे लागणार आहेत. राज्य मंडळांनी ऑनलाईन गुण कसे भरावेत या संदर्भातील कार्यपद्धती जाहीर केली आहे.
परिपत्रक डाऊनलोड करण्यासाठी क्लिक करा.