दहावी/आटीआय पास असलेल्यांना रेल्वेमध्ये सरकारी नोकरी करण्याची संधी ३७४ जागांसाठी भरती.

तुम्ही दहावी पास किंवा आयटीआय झाले असेल, तरी तुम्हाला रेल्वेमध्ये सरकारी नोकरी करण्याची संधी आहे. बनारस लोकोमोटिव्ह वर्क्स यांनी अप्रेंटिसच्या पदासाठी बंपर भरती काढली आहे. तुम्हाला जर या पदासाठी अर्ज करायचा असेल तर तुम्ही त्यांच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता. एकुण ३७४ जागांसाठी ही भरती आहे.
या पदांसाठी अर्ज करू इच्छिणारा कोणताही उमेदवार 25 नोव्हेंबर किंवा त्यापूर्वी अर्ज करू शकतो. तसेच, कागदपत्रे अपलोड करण्याची अंतिम तारीख 27 नोव्हेंबर 2023 आहे.
IIT जागा: 300 जागा व ITI नसलेल्या जागा: 74 पदे
ITI नसलेले: उमेदवारांनी इयत्ता 10 वी परीक्षा किंवा त्याच्या समकक्ष परीक्षा किमान 50% गुणांसह उत्तीर्ण केलेली असावी. उमेदवाराने अधिसूचना जारी होण्याच्या तारखेपूर्वी विहित पात्रता उत्तीर्ण केलेली असावी.
ITI: उमेदवारांनी किमान 50% गुणांसह 10वी वर्ग परीक्षा किंवा त्याच्या समकक्ष मान्यताप्राप्त बोर्डातून उत्तीर्ण केलेली असावी आणि संबंधित ट्रेडमध्ये ITI प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. ITI उत्तीर्ण नसलेल्यांसाठी वयोमर्यादा 15 ते 22 वर्षे आणि ITI उत्तीर्णांसाठी वयोमर्यादा 15 ते 24 वर्षांच्या दरम्यान असावी. उमेदवारांना अर्ज फी म्हणून 100 रुपये भरावे लागतील. पेमेंट डेबिट/क्रेडिट किंवा इंटरनेट बँकिंगद्वारे करता येईल.
https://blw.indianrailways.gov.in/
अधिक माहितीसाठी इंडियन रेल्वेच्या वेबसाईटला भेट द्या.
