दहावी,बारावीचा निकाल डिजिलॉकर अॅप आणि वेबसाईटवर…
सीबीएसई बोर्डाच्या दहावी, बारावीच्या परीक्षा संपून जवळपास दोन महिने उलटले आहेत. त्यामुळे आता विद्यार्थ्यांना निकालाचे वेध लागले आहे. निकाल कधी लागणार या प्रतिक्षेत असताना निकालासंदर्भात केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाकडून महत्वाची माहिती देण्यात आली आहे. निकाल हा बोर्डाची अधिकृत वेबसाइट cbse.gov.in वर जाहीर करण्यात येणार आहे. परंतु, प्रथमच डिजिलॉकर अॅप आणि वेबसाइट digilocker.gov.in वर देखील पाहायला मिळणार आहे. त्यासाठी डिजिलॉकरवर खाते असणे गरजेचे आहे.
प्रथम DigiLocker च्या अधिकृत वेबसाइट digilocker.gov.in वर जा. त्यानंतर “Get Started with Account Confirmation” वर जावे. तुमचा वर्ग (10वी किंवा 12वी) निवडा आणि त्यानंतर शाळेचा कोड, रोल नंबर आणि 6 अंकी प्रवेश कोड टाका. आता मोबाईल नंबर, जन्मतारीख आणि OTP इत्यादी तपशील भरा. निकाल जाहीर झाल्यानंतर, तुम्हाला तुमचा निकाल थेट या खात्यावर मिळेल. तुमचे डिजिलॉकरवर खाते असेल तर तशी सूचना तुम्हाला खाते तयार करताना देईल. त्यामुळे पुन्हा खाते तयार करण्याची गरज नाही. वेबसाईटप्रमाणे डिजिलॉकर अॅपवर या पद्धतीने खाते उघडता येईल. त्यासाठी गूगल प्ले स्टोर अॅप डाऊनलोड करुन घ्यावा.


