अपडेटमहाराष्ट्रशैक्षणिक

दहावीचा निकाल सोमवारी, राज्य मंडळाची अधिकृत घोषणा

Share this post

महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मार्च 2024 मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता दहावीच्या परीक्षेचा निकाल येत्या सोमवारी म्हणजेच 27 मे रोजी दुपारी एक वाजता ऑनलाईन पद्धतीने जाहीर केला जाणार आहे. राज्य मंडळातर्फे यासंदर्भातील अधिकृत परिपत्रक प्रसिद्ध करण्यात आले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांची निकालाबाबतची उत्सुकता आता संपुष्टात येणार आहे. विद्यार्थी खाली दिलेल्या लिंक वर जाऊन निकाल पाहू शकतात.

राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी येत्या 27 मे पर्यंत निकाल जाहीर होईल,अशी घोषणा केली होती.त्यानुसार राज्य मंडळाने निकाल 27 मे रोजी जाहीर करण्याबाबतचे परिपत्रक प्रसिध्द केले आहे. यंदा प्रथमच मे महिन्यातच दहावीचा निकाल जाहीर होत आहे. यापूर्वी जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात निकाल जाहीर करण्याची परंपरा होती.परंतु, विद्यार्थ्यांचे अंतर्गत मूल्यमापनाचे गुण ऑनालाईन पद्धतीने मागवले जात असल्याने निकाल लवकर जाहीर करणे शक्य होत आहे.

१. https://mahresult.nic.in

२. http://sscresult.mkcl.org

३. https://sscresult.mahahsscboard.in

४. https://results.digilocker.gov.in

५. https://results.targetpublications.org

६. https://www.tv9marathi.com


Share this post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *