दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेतल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात ८ गडी राखून भारताचा विजय…
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या ३ सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतल्या पहिल्या सामन्यात भारतीय संघानं ८ गडी राखून विजय मिळवला. १६ व्या षटकात २ गडी गमावून भारतानं ही कामगिरी केली. साई सुधर्सननं ५५ आणि श्रेयस अय्यरनं ५२ धावांचं योगदान दिलं.
नाणेफेक जिंकून पहिल्यांदा फलंदाजी करताना दक्षिण आफ्रिकेचा डाव २७ व्या षटकात ११६ धावात आटोपला. भारताकडून अर्शदीप सिंगनं ५ आणि आवेश खान यानं ४ गडी बाद केले. अर्शदीप सिंग सामनावीराचा मानकरी ठरला.
Scalping a 5⃣-wicket haul, Arshdeep Singh was on a roll with the ball & bagged the Player of the Match award as #TeamIndia won the first #SAvIND ODI. 👏 👏
— BCCI (@BCCI) December 17, 2023
Scorecard ▶️ https://t.co/tHxu0nUwwH pic.twitter.com/tkmDbXOVtg