तिसरी ते नववीच्या विद्यार्थ्यांची पायाभूत चाचणी १० ते १२ जुलै या कालावधीत
महाराष्ट्र राज्य शैक्षणिक व संशोधन प्रशिक्षण परिषदेतर्फे राज्यातील शासकीय, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा व खासगी अनुदानित शाळांमधील तिसरी ते नववीच्या विद्यार्थ्यांसाठी तीन नियतकालिक मूल्यमापन चाचण्या घेतल्या जाणार आहेत.त्यातील पायाभूत चाचणी 10 ते 12 जुलै या कालावधीत होणार असून संकलित मूल्यमापन चाचणी 1 आणि संकलित मूल्यमापन चाचणी 2 अशा चाचण्या घेतल्या जाणार आहेत,असे प्रशिक्षण परिषदेचे संचालक राहुल रेखाराव यांनी परिपत्रकाद्वारे स्पष्ट केले आहे.
पायाभूत चाचणी ही दहा माध्यमांमध्ये घेण्यात येणार आहे. तिसरी ते नववीच्या विद्यार्थ्यांची पायाभूत चाचणीत प्रथम भाषा , गणित तृतीय भाषा इंग्रजी या विषयाची लेखी व तोंडी परीक्षा घेतली जाणार आहे. मागील इयत्तेच्या अभ्यासक्रमानुसार अध्ययन निष्पत्ती, मूलभूत क्षमता यावर ही चाचणी आधारित असणार आहे.
महाराष्ट्र राज्य शैक्षणिक व संशोधन प्रशिक्षण परिषदेतर्फे पायाभूत चाचणीसाठी प्रथम भाषा, गणित, तुतीय भाषा , इंग्रजी या विषयाच्या प्रश्नपत्रिका पुरवल्या जाणार आहेत.परीक्षेसाठी सर्व विद्यार्थी उपस्थित राहित यांची दक्षता घेण्यात यावी. तसेच एखादा विद्यार्थी गैरहजर असल्यास तो ज्या दिवशी वर्गात उपस्थित राहील त्यादिवशी त्यांची परीक्षा घ्यावी,अशा सूचना देण्यात आल्या आहेत.
