अपडेटऑटोराष्ट्रीय

ड्रायव्हिंग लायसन्स मिळविण्यासाठी सरकारने नियम बदलले.

Share this post

ड्रायव्हिंग लायसन्स परवान्यासाठी लेखी परीक्षेपासून ते वाहन चालविण्याच्या चाचणीपर्यंत अनेक प्रक्रिया पूर्ण कराव्या लागतात. तसेच त्यासाठी तासन् तास लांब रांगेत उभे राहावे देखील लागते.

पण आता या सर्व समस्यांपासून तुमची सुटका होणार आहे. कारण- रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय ड्रायव्हिंग लायसन्ससंबंधी नवीन नियम आणत आहे. या नियमांचे पालन केल्यास तुम्हाला चाचणी देण्यासाठी रांगेत उभे राहावे लागणार नाही.

ड्रायव्हिंग लायसन्स मिळविण्यासाठी सरकारने नियम बदलले आहेत. सरकारी प्रादेशिक परिवहन कार्यालयात व्यक्तींना ड्रायव्हिंग चाचणी देण्याची गरज नाही.त्याऐवजी खासगी संस्थांना आता चाचण्या घेण्यास आणि प्रमाणपत्र देण्यास अधिकृत करण्यात आले आहे की, ते प्रशिक्षणार्थींना ड्रायव्हिंग लायसन्स देऊ शकतात. हे नियम 1 जून 2024 पासून लागू करण्यात आले आहे.

खासगी दुचाकी वाहनचालक प्रशिक्षण केंद्राकडे किमान एक एकर जमीन असणे आवश्यक आहे. चारचाकी मोटार वाहनचालक प्रशिक्षण केंद्राकडे अतिरिक्त दोन एकर जमीन आवश्यक आहे.

वाहनचालकाच्या चाचणीसाठी आवश्यक त्या सुविधा खासगी वाहनचालक प्रशिक्षण केंद्राकडे असणे आवश्यक आहे.

प्रशिक्षकांसाठी पात्रता : प्रशिक्षकांकडे किमान हायस्कूल डिप्लोमा असणे आवश्यक आहे. त्याव्यतिरिक्त त्यांच्याकडे किमान पाच वर्षांचा वाहन चालविण्याचा अनुभव असणे आवश्यक आहे. प्रशिक्षकांना बायोमेट्रिक्स आणि माहिती तंत्रज्ञान प्रणालीशी संबंधित मूलभूत गोष्टी परिचित असल्या पाहिजेत.


Share this post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *