अपडेटक्राईममहाराष्ट्र

डॉ.नरेंद्र दाभोलकर हत्याकांडात 11 वर्षांनंतर निकाल, 5 पैकी 2 दोषी, 3 निर्दोष…

Share this post

अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्याकांडाचा निकाल समोर आला आहे. गेल्या 11 वर्षांपासून सुरू असलेल्या या प्रकरणाचा निकाल लागला आहे. यातील पाचपैकी दोन दोषींना जन्मठेप सुनावण्यात आली असून तिघांना निर्दोष करण्यात आले आहे.

15 सप्टेंबर 2021 रोजी पुणे स्पेशन कोर्टाने दाभोलकर हत्या प्रकरणात पाच जणांवर आरोप निश्चित केला. डॉ. वीरेंद्र सिंह तावड़े, सचिन अंदुरे, शरद कालस्कर आणि विक्रम भावे याच्यावर हत्या, हत्येचा कट रचणे आणि शस्त्रास्त्र कायद्याशी संबंधित कलमांतर्गत आरोप ठेवण्यात आले होते. याशिवाय संजीव पुनालेकर याला पुरावे नष्ट करणे आणि चुकीची माहिती देण्यासाठी आयपीसी कलम 201 अंतर्गत आरोप करण्यात आले.

यापैकी सचिन अंदुरे आणि शरद कळसकरांना सश्रम जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. याशिवाय विक्रम भावे, वीरेंद्र तावडे, संजीव पुनालेकर यांची निर्दोष सुटका करण्यात आली आहे.

20 ॲागस्ट 2013 ला मॉर्निंग वॉकसाठी निघालेल्या डॉ. दाभोलकरांवर दुचाकी वरुन आलेल्या दोन जणांनी गोळ्या झाडल्या होत्या. बालगंधर्व जवळील विठ्ठल रामजी शिंदे पुलावर ही घटना घडली होती.

पुणे पोलिसांनी सुरुवातीला या प्रकरणात नागोरी टोळीला अटक केली होती. मात्र नंतर या तपासावरच प्रश्नचिन्ह निर्माण झालं. या प्रकरणीमग दाभोलकर कुटुंबीयांनी हाय कोर्टात याचिका देखील दाखल केली होती.त्यानंतर गौरी लंकेश प्रकरणाचा तपास सुरु असताना या प्रकरणाच्या सनातन संस्थेशी असलेल्या लिंक्स उघड झाल्या.

दरम्यान या प्रकरणाचा तपास देखील आधी पुणे पोलिस, मग एटीएस आणि त्यानंतर सीबीआयकडे सोपवण्यात आला.

या प्रकरणात सचिन अंदुरे, शरद कळस्कर, वीरेंद्र तावडे, अॅडव्होकेट संजीव पुनाळेकर आणि विक्रम भावे या पाच जणांना अटक करण्यात आली. त्यांच्यावर आरोपपत्र देखील दाखल करण्यात आलं होतं.या प्रकरणाची सुनावणी पुण्यातील विशेष न्यायाधीश पी. पी. जाधव यांच्या न्यायालयात सुरू होती. 2021 मध्ये या पाचही जणांवर आरोप निश्चित करण्यात आले होते.या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या आरोपींवर हत्या, हत्येचा कट रचणे तसेच युएपीए अंतर्गत गुन्हे निश्चित करण्यात आले होते.


Share this post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *