अपडेटतंत्रज्ञान

डिलीट होणार तुमचे जुने ई-मेल अकाऊंट -Google ने घेतला निर्णय…

Share this post

Google तुमचे Gmail ई-मेल अकाऊंट कायमचे डिलीट करणार आहे. गुगलनं ही घोषणा यावर्षी मे मध्ये केली होती. गुगलच्या मते ज्या युजर्सनी गेल्या दोन वर्षात आपले जीमेल अकाऊंट वापरले नाहीत त्यांचं अकाऊंट गुगल डेटाबेसमधून डिलीट केलं जाईल.गुगलनं आपली इन-अ‍ॅक्टिव्ह अकाऊंट पॉलिसी अपडेट केली आहे, त्यामुळे जुने इन-अ‍ॅक्टिव्ह अकाऊंट्सवर ही कारवाई केली जाईल.

Google हे अकाऊंट्स शुक्रवारी १ डिसेंबरपासून टप्प्याटप्प्यात डिलीट करण्यास सुरु करेल. तुमच्याकडे देखील जर असे अकाऊंट्स असतील तर तुम्हाला गुगलकडून अनेक नोटिफिकेशन मिळाल्या असतील किंवा मिळतील. त्यानंतरच अकाऊंट डिलीट करण्याची प्रक्रिया सुरु केली जाईल.

गुगलनं मे मध्ये घोषणा करताना सांगितलं होतं की न वापरलेले किंवा इन- अ‍ॅक्टिव्ह अकाऊंट्समध्ये जुने पासवर्ड असतील आणि ह्या अकाऊंट्स मध्ये टू-फॅक्टर ऑथेंटिकेशन सेट नसेल. त्यामुळे हे अकाऊंट्स हॅक होण्याची शक्यता जास्त आहे. त्यामुळे युजर्सच्या ह्या अकाऊंट्सचा वापर हॅकर्स फसवणूक आणि सायबर क्राइमसाठी करू शकतात. त्यामुळे गुगलनं आपली इन-अ‍ॅक्टिव्ह अकाऊंट पॉलिसी अपडेट केली आहे. ज्या युजर्सनी आपले अकाऊंट्स गेल्या दोन वर्षात अ‍ॅक्सेस केले नाहीत त्यांचे अकाऊंट १ डिसेंबरपासून कायमचे डिलीट केले जातील.गुगलची ही पॉलिसी फक्त पर्सनल म्हणजे खाजगी अकाऊंट्सवर लागू होईल. संस्था जसे की शाळा, कॉलेज, कंपनी इत्यादींचे जुने अकाऊंट ह्या नवीन पॉलिसीमुळे डिलीट होणार नाहीत.


Share this post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *